Home Breaking News Chandrapur city@ news •राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन चंद्रपूरचे...

Chandrapur city@ news •राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना सादर

82

Chandrapur city@ news

•राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना सादर!

चंद्रपूर :किरण घाटे

आज गुरुवार दि.27 जूनला महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाची भूमिका घेण्याबाबत, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने विभागीय अध्यक्ष, नागपूर विभागाचे राजू धांडे यांचे नेतृत्वाखाली चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आकृतीबंध व इतर मागण्या मंजूर होणे आवश्यक असल्याचे सांगून, संघटनेची भूमिका योग्य व रास्त असल्याचे मत व्यक्त केले. निवेदन सादर करताना महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे महसूल राज्य कर्मचारी संघटनेचे जबाबदार पदाधिकारी अजय मॅकलवार यांनी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान सांगितले.