Home Breaking News Varora taluka@ news • नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा कार्यक्रम

Varora taluka@ news • नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा कार्यक्रम

22

Varora taluka@ news
• नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा कार्यक्रम

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा :शाळेचा पहिला दिवस म्हणजे 26 जून 2024 ला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला सुरुवात झाली आहे आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन च्या वर्ग नववीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून त्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांच्यासह शिक्षक वृंदांनी आणि दहावीच्या विद्यार्थ्याकडून औक्षवंत करून पुष्प उधळून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
तदनंतर नवप्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवनचे प्रभारी मुख्याध्यापक उमाटे सर यांची उपस्थिती होती तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमात प्रास्ताविक मुख्याध्यापिका विद्या गोकरे यांनी केले कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी उमाटे सर सहाय्यक शिक्षिका शिमिता काळे मॅडम अशी शेटे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यात सर्व शिक्षकांनी विषयांनव्ये अभ्यासक्रमाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक आशिष येटे सरांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक हर्षल चौधरी यांनी केले.

आनंद माध्यमिक विद्यालयाची प्रगतीकडे वाटचाल

महारोगी सेवा समिती आनंदवन द्वारा संचालित आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन श्रद्देय बाबा आमटे यांच्या पावनभूमीत 2018 या वर्षाला सुरु झाले असून वर्ग नववी व दहावी असें दोन वर्ग आहे. शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असून उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवत आहे. आनंदवन परिसरातील जवळपास खेड्यातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूरांची मुले शिकावी यासाठी जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी शाळेची मुहूर्तमेढ रोवली. आज आनंदवन
येथील निसर्गमय वातावरणात वसलेली शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत प्रगतीचे दिशेने वाटचाल करीत आहे.