Home Breaking News Varora taluka @news • वरोरा शहरात डेंग्यू चा प्रादुर्भाव •जून महिन्यात...

Varora taluka @news • वरोरा शहरात डेंग्यू चा प्रादुर्भाव •जून महिन्यात उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर चमुंनी उपचारर्थ केले बरे

35

Varora taluka @news
• वरोरा शहरात डेंग्यू चा प्रादुर्भाव

•जून महिन्यात उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर चमुंनी उपचारर्थ केले बरे

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा : पावसाळा सुरु झाला आहे, वरोरा शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्यामुळे जिवजंतू चा प्रसार वाढला आहे. निर्जूतुकीकरण करणे आवश्यक आहे.यातच डेंग्यू रोगाने तोंड वर काढले असून जून महिन्यात सात बाधित रुग्ण आढळून आले. अनेक संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यू चें दोन रुग्णावर आणि बाहेरच्या पाच रुग्णांवर डॉक्टर चमुंनी उपचार करून बरे केलेत.मेडिकल कॉलेज मधून पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि ते रुग्ण बरे होऊन घरी गेले. असें तालुका वैद्यकीय अधिकारी प्रतीक बोरकर यांनी सांगितले आहे.
तापाची साथ सुरु असून कोणता आजार तोंड वर काढेल याविषयी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरामध्ये कचऱ्यांचे ढिगारे,नाल्यामधून सांडपानी व्यवस्थितपणे वाहून न जाणे, अशा अनेक समस्या शहरात भेड- सावीत असताना नगरपरिषद प्रशासन साखर झोपेत असल्याचे दिसून येत आहे.नागरिकांच्या समस्याशी न. प. प्रशासन खेळ करीत आहे. असें म्हणणे वावगे ठरणार नाही. नगरपरिषद च्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी प्रश्न निर्माण केले आहे. शहरात नागरिकांचे स्वास्थ्य बिघडत आहे परंतु नगरपरीषदने आरोग्यावीषयी नागरिकांचे सेवेसाठी अशी कुठलेही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही.
मात्र उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे हे आपल्या कर्तव्यात तत्पर राहून आपल्या सहकारी डॉ. चमूसह उपचारर्थ आलेल्या रुग्णांवर योग्य तो उपचार करून निरंतर सेवा देताना दिसून येतात. डॉ. खुजे यांचे मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील दोन डेंग्यू चें रुग्णांवर उपचार करून बरे केले. त्यानंतर बाहेरून आलेल्या पाच रुग्णांना सुद्धा बरे केलेत.नगरपरिषदने नागरिकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी शहरात स्वछता अभियान राबविणे गरजेचे आहे. अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत आहे.