Home Breaking News Beed dist @news • अहमदनगर येथे पद्मगंगा फौडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राचार्य...

Beed dist @news • अहमदनगर येथे पद्मगंगा फौडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राचार्य दत्तात्रय वाघ /पत्रकार अविनाश कदम /प्रा सुभाष नागरगोजे यांना जाहीर.

82
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2,"square_fit":1,"addons":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

Beed dist @news

• अहमदनगर येथे पद्मगंगा फौडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राचार्य दत्तात्रय वाघ /पत्रकार अविनाश कदम /प्रा सुभाष नागरगोजे यांना जाहीर.

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर येथील पद्मगंगा फौडेशन भिंगार स्व. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय पद्मगंगा साहित्य पुरस्कार आरोग्य, शिक्षण,कला,साहित्य, पत्रकारिता, क्रीडा, कवी, संस्कृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे दि ९ जुलै रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये आष्टी तालुक्यातील प्राचार्य डॉ दत्तात्रय वाघ,आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, प्रा डॉ सुभाष नागरगोजे यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पद्मगंगा फौंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर, सचिव डॉ. ज्ञानेश्वर ऐतलवाड यांनी दिली.
लोकसाहित्याचे अभ्यासक स्व गंगाधर मोरजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पद्मगंगा फौंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्यातील व विविध क्षेत्रातील उकृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. अहमदनगर येथे आज मंगळवार दि ९ जूलै २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता हमाल पंचायतीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश घुले पाटील (अध्यक्ष, हमाल पंचायत अहमदनगर) हे असून आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती पद्मगंगा फौंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ धो.स.वाडकर यांनी सांगितले .

!! या मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार—
कथा संग्रह पुरस्कार – डॉ. संजीव कुलकर्णी,काव्यसंग्रह पुरस्कार – सरोज अल्हाट,
कांदबरी पुरस्कार – अंबादास हिंगे,समाज भूषण पुरस्कार – ॲड. विश्वनाथ गोलावार,
आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रा.डॉ. दतात्रय तुळशीराम वाघ, दर्पण (पत्रकारिता) पुरस्कार दै.लोकमत/मराठवाडा साथीचे आष्टी तालुका प्रतिनिधी अविनाश कदम,क्रीडास्त्न पुरस्कार – डॉ. सुभाष गुणाजी नागरगोजे,आदर्श शैक्षणिक पुरस्कार – रविंद्र काळे,शत जन्म शोधितांना – प्रदीप श्रीधर मेहंदळे,संजीवनी मराठे व्यक्तित्व आणि कर्तृत्व – शोभा नाखरे, एक तरी ओवी – कृष्णा जाधव यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .!!