Home Breaking News Beed dist @news • स्वाराती रुग्णालय आहे कि लुटारूचा अड्डा ?...

Beed dist @news • स्वाराती रुग्णालय आहे कि लुटारूचा अड्डा ? • रुग्णाचे बेहाल, डॉक्टर करतायत रुग्णांची पळवा पळवी!

173

Beed dist @news

• स्वाराती रुग्णालय आहे कि लुटारूचा अड्डा ?

• रुग्णाचे बेहाल, डॉक्टर करतायत रुग्णांची पळवा पळवी!

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांची जीवन संजीवनी मानली जाते मात्र येथे मागील काही महिण्यापासून रुग्णाचे हेळसांड होत असून रुग्णांची प्रचंड लूट केली जात आहे.अति दक्षता वार्डात जाण्यापूर्वी देवासमोर कर्मचारी १०० रुपये ठेवायले सांगतात डिस्चार्ज होताना कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात अद्यावत ब्लड बँक असताना शहरातील बाहेरच्या लॅब वाल्याकडे रक्त तपासणी साठी पाठवले जाते विशेषत: त्यांनी सांगितलेल्या लॅब मध्येच जावे लागते किंबहुना इतर लॅब चा रिपोर्ट आणला तर ते पाहतही नाही परिणामी रुग्णांना आर्थिक लुटिचा सामना करावा लागतो. ठराविक औषध वगळता बहुतांश गोळया औषधे बाहेरच्या मेडिकल वरून घ्यावी लागतात दवाखाना चे प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल हे नावालाच असून औषध विक्री मात्र इतर मेडिकल च्या भावाने होत असून इथेही रुग्णांची लूट होत आहे त्याच बरोबर येथील शासकीय सेवेत असणारे डॉक्टर पत्नी व नातेवाईकांच्या नावावर काढलेल्या खाजगी रुग्णालयात रुग्णसेवा देण्यात व्यस्त असल्याने स्वार्थी रुग्णालयातील रुग्णांना वेळेत उपचार होत नाहीत तसेच येथे येनाऱ्या रुग्णांची पळवा पळवी येथील डॉक्टर करत त्यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येण्यास सांगतात येथेही त्यांची लूट होत असून स्वाराती रुग्णालय आहे की लुटारूचा अड्डा हा प्रश्न पडत असून स्वाराती रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड व लूट थांबवण्याकरता कोणताही सामाजिक कार्यकर्ता पुढे सरसावत नसल्याने अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषद पुढे येत स्वरातीचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले यावेळी उपाध्यक्ष संजय जोगदंड,मार्गदर्शक सतीश मोरे,सचिव मोहम्मद फैझान,गजानन चौधरी,अरेफ सिद्दीकी, उत्तरेश्वर शिंदे,अहमद पठाण हे उपस्थित होते स्वरातीर येथे कार्यरत डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस बंद करावी तसेच रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवली गेली नाही तर , डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे हे सोमवार पासून आमरण उपोषणास बसणार आहेत .