Home Breaking News सहज सुचलंची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने -शैला चिमड्यालवार

सहज सुचलंची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने -शैला चिमड्यालवार

131

सहज सुचलंची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने -शैला चिमड्यालवार

सावली (चंद्रपूर)विशेष प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे यात मुळीच शंका नाही.आज महाराष्ट्रभर सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपचे नांव पोहचले आहे.अशी प्रतिक्रिया विदर्भातील प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार यांनी शनिवारी मूल नगरीत या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. त्या या शहरात एका छोट्याखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या.
सहज सुचलंच्या नागपूर निवासी मार्गदर्शिका तथा समाजसेविका मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांचे कार्य उल्लेखनीय व प्रशंसानिय असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यातून या वेळी केला.
त्या दोघींच नवोदितांना प्रोत्साहन देण्याचं कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या शैला चिमड्यालवार म्हणाल्या .
ह्या गृपच्या मुख्य संयोजिका चंद्रपूरच्या रंज्जू दिलीप मोडक असून सहसंयोजिका म्हणून मूल शहराच्या नलिनी आडपवार ह्या आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
विदर्भातील जेष्ठ व पुरस्कार प्राप्त साहित्यिक विजया भांगे, चंद्रपूरच्या निवेदिका तथा कवयित्री सीमा पाटील, औरंगाबादच्या अश्विनी दीक्षीत, मुंबईच्या समाजसेविका श्रूति उरणकर, ठाण्याच्या साहित्यिक कु.मंगल मिसाळ , पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार , नागपूर नगरीच्या समाजसेविका नयना झाडे, पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, नाशिकच्या चैताली आत्राम, मूलच्या अर्चना समर्थ, भद्रावतीच्या व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, रजनी रणदिवे या शिवाय सुपरिचित चित्रकार कु. रश्मि पचारे, भद्रावतीच्या कु.प्रियंका गायकवाड , चंद्रपूरच्या अंजली इटनकर, नागपूरच्या डॉ.अंजली साळवे, जेष्ठ समाजसेविका डॉ.स्मिता मेहेत्रे, स्मिता बांडगे, हैद्राबादच्या जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी, मूलच्या सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चावरे, वंदना आगरकाठे, चंद्रपूर येथील समाजसेविका वंदना हातगांवकर, कवयित्री उज्वला नगराळे, वरोराच्या वंदना बोढे, किर्ती पांडे, मुग्धा गायकवाड, शंकरपूरच्या सुपरिचित कवयित्री वर्षा शेंडे, सिंदेवाहीच्या भावना खोब्रागडे यांचे विशेष योगदान सहज सुचलं गृपसाठी लाभले आहे.