Home Breaking News Varora city@ news • तीन दिवसापासून पिण्याचे पाण्यात येतात नारू ...

Varora city@ news • तीन दिवसापासून पिण्याचे पाण्यात येतात नारू • मालवीय वॉर्डातील दूषित पाण्याची समस्या कायम •नागरिकांचे आरोग्य धोक्यात • नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेकडे नागरिकांचे निवेदन

31

Varora city@ news

• तीन दिवसापासून पिण्याचे पाण्यात येतात नारू

• मालवीय वॉर्डातील दूषित पाण्याची समस्या कायम

•नागरिकांचे आरोग्य धोक्यात

• नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेकडे नागरिकांचे निवेदन

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : पावसाळा सुरु असून मालवीय वार्डात नळाला दूषित पाणी येण्याची शृंखला सुरु असल्याने परशुराम छत्रीय या नागरिकाच्या घरी तीन दिवसापासून नळाचे पाण्यात नारुसारखा सूक्ष्म जंतू येत आहे. त्यामुळे परिवाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.पीडित नागरिकासह वॉर्डातील नागरिक शिष्ट मंडळाने मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा यांना दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी 16 जुलै 2024 ला समस्यांचे निवेदन दिले आहे.
नगरपरिषद कडे शहरातील समस्या सोडविण्याचे दायित्व असुन समस्यांचे निराकारण करण्याचे लोकहिताचे दालन आहे. मालवीय वार्डात काही दिवसापूर्वी अतिसाराने एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.मोठ्या प्रमाणात मालवीय वॉर्डात समस्याचा डोंगर उभा असताना नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे. वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन पुढे का सरसावीत नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. वॉर्डातील परशुराम छत्रीय यांचे घरी नळाचे पिण्याचे पाण्यात तीन दिवसापासून नारुसारखा सूक्ष्म जंतू निघत आहे. यामुळे परिवाराचे आरोग्य धोक्यात आले आहे.16जुलै ला परशुराम छत्रीय यांच्यासह नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेकडे समस्यांचे निवेदन सादर केले आहे. मालवीय वॉर्डातील नागरिक गंभीर समस्यानी त्रस्त असतानासुद्धा नगरपरिषद प्रशासन साखर झोपेत आहे अशाही प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कोणते पाऊल उचलतात याकडे मालवीय वॉर्ड नागरिकांचे लक्ष लागले आहे.नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देताना शिष्ट मंडळात सुभाष वांढरे, संजय पेंदोर, राहुल देवढे, सुनील झाडे,किसन कळसकर आदींची उपस्थिती होती.