Home Breaking News Chandrapur dist@ news • प्रलंबित रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचा-यांचा उद्या...

Chandrapur dist@ news • प्रलंबित रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचा-यांचा उद्या बेमुदत संप! •शासनाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता! •महसूल कर्मचा-यांनी उत्स्फूर्तंपणे संपात सहभागी व्हावे -शैलेश धात्रक,अमोल आखाडे व दीपक वडूळे यांचे कर्मचाऱ्यांना आवहान

48

Chandrapur dist@ news
• प्रलंबित रास्त मागण्यांसाठी
चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचा-यांचा उद्या बेमुदत संप!
•शासनाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता!
•महसूल कर्मचा-यांनी उत्स्फूर्तंपणे संपात सहभागी व्हावे -शैलेश धात्रक,अमोल आखाडे व दीपक वडूळे यांचे कर्मचाऱ्यांना आवहान

सुवर्ण भारत : किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर : शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध रास्त मागण्यांसाठी  चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी बांधव बेमुदत संपावर जात आहे.
राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने उद्या पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचा-यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवहान महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शैलेश धात्रक, दीपक वडूळे व अमोल आखाडे यांनी आज महसूल कर्मचारी बांधवांना केले आहे.

शुक्रवारी महसूल कर्मचा-यांनी पुकारलेल्या लेखनी बंद आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जबाबदार पदाधिकारी अजय मॅकलवार यांनी केला आहे.
दरम्यान उद्या पुकारण्यात येत असलेल्या बेमुदत संपामुळे शासकीय कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारी होणा-या संपात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येंने सहभागी होत असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे नितिन पाटील यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
राज्य सरकारने त्यांच्या रास्त मागण्यांची अद्याप दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव राज्य महसूल कर्मचारी संघटनेला १५जूलै पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे संघटनेच्या एका जबाबदार पदाधिका-याने सांगितले

उद्या होवू घातलेल्या या बेमुदत संपात चंद्रपूर जिल्हा कोतवाल संघटनेचे सर्व सदस्यगण सहभागी होत असल्याचे महसूल कर्मचारी अजय गाडगे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सध्या लाडकी बहिण या योजनेची घोषणा झाल्यामुळे प्रत्येक तहसिल कार्यालयात जनतेची गर्दी वाढली असून महसूल विभागात आजही बरीच पदे रिक्त असल्याचे बोलल्या जाते.प्रत्येक वेळी शासन राज्य महसूल कर्मचारी संघटनेला आश्वासन देते पण त्या आश्वासनांची पूर्तता शासन करीत नाही त्यामुळे कर्मचारी वर्गांना बेमुदत संपावर जाण्याचे हत्यार उपसावे लागते .
.