Home Breaking News Ballarpur taluka@News •बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे )येथील घटना पत्नीने केली पतीची...

Ballarpur taluka@News •बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे )येथील घटना पत्नीने केली पतीची हत्या • पतीचा धारदार शस्त्राने चिरला गळा

757

Ballarpur taluka@News

•बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे )येथील घटना पत्नीने केली पतीची हत्या

• पतीचा धारदार शस्त्राने चिरला गळा

सुवर्ण भारत:तालुका प्रतिनीधी, बल्लारपूर

बल्लारपूर :- पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे घर बर्बाद होऊ लागले. यामुळे पतीपत्नीत वाद होत होता. नेहमीच्या भांडणाला कंटाळून पत्नीने टोकाचा निर्णय घेतला.धारदार शस्त्राने तिने पतीचा गळा चिरला. पत्नीने पतीची  हत्या केल्याची ह्रदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथे बुधवार ( दि.१७ ) रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. हत्या झालेल्या पती चे नाव अमोल मंगल पोडे ( वय ३८ ) रा.नांदगाव ( पोडे ) ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर असे आहे.

घटनेतील आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे ( वय  35 ) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. बल्लारपूर तालुक्यात नांदगाव ( पोडे )  या गावात पतिपत्निच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता उघडीला आल्यावर घटनास्थळी गावाकऱ्यांनी एकच गर्दी केली.
मृतक अमोल हा पत्नी लक्ष्मी व दोन मुले देवांश अमोल पोडे ( ११) आणि सारंग अमोल पोडे ( ८ ) सोबत राहत होते. मात्र अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले.यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता.  यामुळे पत्नी लक्ष्मी त्रस्त होती. नेहमी प्रमाणे  बुधवारी अमोल घरी दारू पिऊन  आला.घरी आल्यावर त्याने पत्नी लक्ष्मी सोबत वाद घातला.  दोन्ही मुले व लक्ष्मीची आई झोपी गेले.

ही संधी साधून कातीने,धारदार शस्त्राने अमोलचा गळा चिरून हत्या केली  मृत झाला. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना देण्यात आली. विशेष म्हणजे पतीच्या निर्घून हत्येची माहिती स्वतः लक्ष्मीने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळ  घटनेचा पंचनामा केला.अमोलचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.

व लक्ष्मीचे मुले देवांश पोडे व सारंग पोडे कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेत होती.मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनामुळे खर्च परवडत नव्हता.त्यामुळे अमोलने  ६ दिवसापूर्वी नांदगाव ( पोडे ) येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत देवांशला ८ व्या ,तर सारंगला तिसऱ्या वर्गात प्रवेश घेतला.

पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस करत आहे