Home Breaking News Beed dist @news  • रुग्णाच्या समस्या बाबत पत्रकार अभिजीत लोमटे यांच्या...

Beed dist @news  • रुग्णाच्या समस्या बाबत पत्रकार अभिजीत लोमटे यांच्या आमरण  उपोषणास प्रारंभ —- •सर्व राजकीय पक्षांनी पत्रकारांनी पाठींबा दर्शविला   •प्रशासन आंदोलनाची दखल घेत  कारवाई काय करणार ?

109

Beed dist @news

रुग्णाच्या समस्या बाबत पत्रकार अभिजीत लोमटे यांच्या आमरण  उपोषणास प्रारंभ —-

•सर्व राजकीय पक्षांनी पत्रकारांनी पाठींबा दर्शविला 

 •प्रशासन आंदोलनाची दखल घेत  कारवाई काय करणार ?

सुवर्ण भारत:गोरख मोरे( बीड जिल्हा प्रतिनिधी) 

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील रुग्णाच्या विविध समस्या बाबत अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे  आमरण उपोषणास बसले असून या उपोषणास काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,वंचित बहुजन आघाडी,शिवसेना (उबाठा),महाराष्ट्र विकास आघाडी ,डिजिटल मिडीया परिषदे,आदींनी पाठिंबा दर्शवला आहे .

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांची जीवन संजीवनी मानली जाते . मात्र येथे मागील काही महिण्यापासून रुग्णाचे हेळसांड होत असून रुग्णांची प्रचंड लूट याठिकाणी केली जात आहे . अति दक्षता वार्डात जाण्यापूर्वी देवासमोर काही कर्मचारी पैसे ठेवायले सांगतात, डिस्चार्ज होताना कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात.

अद्यावत ब्लड बँक असताना शहरातील बाहेरच्या लॅब वाल्याकडे रक्त तपासणी साठी पाठवले जाते. विशेषत: त्यांनी सांगितलेल्या लॅब मध्येच जावे लागते, किंबहुना इतर लॅब चा रिपोर्ट आणला तर ते पाहतही नाही ?  परिणामी रुग्णांना आर्थिक लुटिचा सामना करावाच लागतो. ठराविक औषध वगळता बहुतांश गोळया औषधे बाहेरच्या मेडिकल वरून घ्यावी लागतात , दवाखाना चे प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल हे नावालाच असून , औषध विक्री मात्र इतर मेडिकल च्या भावाने होत असून इथेही रुग्णांची लूट होत आहे .

त्याच बरोबर येथील शासकीय सेवेत असणारे डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस बंद कराव्या ,  स्वाराती रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड व लूट थांबविण्याकरता अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे हे आज दिनांक 22 जुलै 2024 आज सोमवारपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून , अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे पत्रकार सतीश मोरे,संजय जोगदंड,सय्यद नईम,मोहम्मद फैजान गजानन चौधरी,आरेफ सिद्दीकी, उत्तरेश्वर शिंदे, अहमद पठाण .

तसेच या उपोषणास काँग्रेस शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब,शिवसेना केज विधानसभा प्रमुख मदनलाल परदेशी तसेच वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष गोविंद मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा प्रवक्ता ऍड इस्माईल गवळी, महाराष्ट्र विकास आघाडी तालुकाध्यक्ष ताहेर चाऊस आदींनी पाठिंबा दिला असून  , आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेत काय कारवाई करणार? असा सुर शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या तोंडून निघाला असून हे अगामी काळात पाहावे लागेल .