Home Breaking News Beed dist @news • आष्टीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ...

Beed dist @news • आष्टीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा— माजी आ. भीमराव धोंडे • सलग दुसऱ्या वर्षी होणार स्वामीनाथन कृषी प्रदर्शन •कृषी मंत्री धनंजय मुंडे व आ. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे 29 ऑगस्ट रोजी उद्घाटन

162

Beed dist @news

• आष्टीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा— माजी आ. भीमराव धोंडे

• सलग दुसऱ्या वर्षी होणार स्वामीनाथन कृषी प्रदर्शन

•कृषी मंत्री धनंजय मुंडे व आ. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे 29 ऑगस्ट रोजी उद्घाटन

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संचलित श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषि महाविद्यालय यांच्या वतीने व शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन आष्टी येथे होणार आहे .
कृषी मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे, भाजपाच्या नेत्या आ. पंकजाताई मुंडे, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे . तर समारोप अ. भा. वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे . सांगली येथील व देशातील सर्वात उंच 41 लाख रुपये किमंतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे . अशी माहिती माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली .
आष्टी येथील भगवान महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कृषी प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की , गतवर्षी हे प्रदर्शन उशिरा झाले होते , परंतु यावेळी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात काय पिके घेता येतील त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन प्रदर्शनातून मिळणार आहे , 1 लाख 25 हजार‌ शेतकऱ्यांनी गतवर्षी कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला , कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत कृषी संबंधित तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे , कृषी प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येईल व लकी शेतकऱ्यांला शेती उपयोगी भेट वस्तू देण्यात येईल , शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉ काढुन विजेत्याला बक्षीस दिले जाईल , कृषी प्रदर्शनात जिरेनियम शेती, खेकडा पालन, गोमातेच्या शेणापासून विविध वस्तू कशा निर्माण करायच्या यांची माहिती मिळणार आहे , महिलांनी घरबसल्या घरगुती व्यवसाय करणे, विविध प्रकारचे ट्रॅक्टर व अवजारे, दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अत्याधुनिक मशिन, कुक्कुटपालन माहिती तसेच बॅंके मधून लोन कसे काढायचे यांची माहिती घेणे. गांडूळ खत कसे बनविने मार्गदर्शन, खवय्यांसाठी विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील खाद्यपदार्थ खाण्यासाठी व विक्री साठी स्टाॅल उपलब्ध असणार आहे. शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा महाविद्यालयतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला, नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील. गतवर्षी एकुण 100 स्टाॅल होते यावर्षी 150 स्टाॅल राहतील. शेतकऱ्यांच्या सोबत लहान मुले येतात त्यांच्या मनोरंजनाची सोय करण्यात येणार आहे. गेल्या प्रदर्शनात 7 ते 8 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती यावर्षी हा आकडा वाढणार आहे , शेतकऱ्यांना हेलीकॉप्टरमध्ये बसण्याची संधी मिळत नाही त्यामुळे यावेळी हेलीकॉप्टर सफरची सोय करण्यात आली आहे त्यासाठी नाव नोंदणी कृषी महाविद्यालयात करावी लागेल हे सफर तिस किलो मिटर अंतरावर सहा हजार रुपये या अल्प दरात होईल. हे प्रदर्शन मोफत आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे . या प्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आरसुळ एस. आर. उपस्थित होते .