Home Breaking News Chandrapur dist@ News • बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण...

Chandrapur dist@ News • बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण करणाऱ्या मयूर चा बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद वरोरा तर्फे सत्कार

15

Chandrapur dist@ News
• बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण करणाऱ्या मयूर चा बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद वरोरा तर्फे सत्कार

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम 
प्रतिनीधी, वरोरा

वरोरा – चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील रहिवासी असलेला मयूर महादेव देऊरमल्ले हा युवक सायकल ने प्रवास करीत 12 ज्योतिर्लिंग ,चारधाम यात्रा पूर्ण करत घरी परतताना वरोरा येथील हनुमान मंदिर यात्रा वॉर्ड येथे विश्व हिंदू परिषद,बजरंग दल वरोरा तर्फे त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सहा महिन्यांपूर्वी घरून निघताना 12 ज्योति्लिंगां चार धाम यात्रा पूर्ण करण्याचा निश्चय करत सहा महिन्यात श्री शैलम ,मल्लिकांर्जून , रामेश्र्वरम , वैजनाथ , काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर ,घृष्णेश्वर ,सोमनाथ केदारनाथ ,महाकालेश्वर ,ओंकारेश्वर ,चार धाम मधील द्वारका ,जगन्नाथ पुरी ,रामेश्वर ,बद्रीनाथ असा एकूण 18000 किलोमीटर चा प्रवास सायकल ने पूर्ण केला .सायकल ने प्रवास करताना खूप मेहनत घ्यावी लागली परंतु ईश्वरीय आशीर्वादाने हे सर्व शक्य झाल्याचे मयूर ने सांगितले .
महाराष्ट्रातील तिन्ही ज्योतिर्लिंग पूर्ण करत मध्य प्रदेशातील महाकलेश्वर व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन घेत गुजरात राज्यातील सोमनाथ ,द्वारका येथे दर्शन घेतले .त्यानंतर केदारनाथ बद्रीनाथ येथील कपाट बंद असल्याने दक्षिणेकडील रामेश्वरम,श्री शैलं ,मल्लिकार्जुन, जगन्नाथ पुरी छा प्रवास करत केदारनाथ ,बद्रीनाथ ,पांच केदार दर्शन मयूर ने पूर्ण केले .
मयूर देऊरमर्ल्ले यांच्या घरी आई, वडील ,मोठा भाऊ ,आजी ,आजोबा असा परिवार आहे .त्यांचा परिवाराची उपजीविका शेतीवर आहे . मोठा भाऊ परिवाराची काळजी घेत असल्याने मी मोकळ्या मनाने फिरू शकत असल्याचे मयूर ने सांगितले.

*मुस्लिम युवकाने देखील केली मदत*

उत्तरप्रदेशातील वाराणसी ज्योतिर्लिंग दर्शनाकरीता जात असताना सायकल पंक्चर झाल्यावर एका मुस्लिम दुकादारांने पैसे न घेताच सायकल पंक्चर दुरुस्ती करून दिली .आमच्या समजातील लोक हज यात्रेला जातात तसच तुम्ही 12 ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा करत आहात तर माझ्याकडुन तुम्हाला मदत करायला हरकत नाही असे त्या युवकाने म्हटल्याचे मयूर ने सांगितले.

मयूर सायकल वाला म्हणून समाज माध्यमांवर प्रसिद्ध
इंस्टाग्राम मध्ये मयूर सायकल वाला हा आपल्या प्रवासातील प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ टाकत पूर्ण 12 ज्योति्लिंगां व 4 धाम यात्रा पूर्ण केली त्यामुळे प्रसिध्दी देखील मिळाली.

त्या निमित्य विश्व् हिंदू परिषद बजरंद्ल् अध्यक्ष विजय जुनघरे,चेतन जीवतोडे,वैभव ठाकरे,शुभम गोल्हार,बाला चांभारे,तेजस लोहकरे,रोहित पिंपळशेंडे,ओम कांबळे चेतन निकोडे आकाश काकडे अन्य सर्व सदस्य उपस्थित होते.