Home Breaking News Varora taluka@ News • इको कारची दुचाकीला धडक •कारमधील शालेय सहा विद्यार्थी...

Varora taluka@ News • इको कारची दुचाकीला धडक •कारमधील शालेय सहा विद्यार्थी जखमी

80

Varora taluka@ News
• इको कारची दुचाकीला धडक
•कारमधील शालेय सहा विद्यार्थी जखमी

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर

वरोरा तालुका प्रतिनिधी

वरोरा : वरोऱ्यातील हिरालाल लोया महाविद्यालयीन विद्यार्थी रोजनीशी प्रमाणे इको कार मध्ये सुट्टी झाल्यानंतर पाहुना, धानोली गावाकडे प्रवासासाठी निघाले असता, जामगाव नदीजवळ इको कार ची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये कारनी दोन -तीन पलट्या मारल्या आणि या अपघातात कार मधील सहा विद्यार्थी जखमी झाले. सदर घटना 5ऑगस्ट 2024 ला सकाळी 12.30 चे सुमारास घडली. चार जखमी विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार सुरु असून दोन विद्यार्थी खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. घटनास्थळावरून कार चालक फरार झाल्याचे वृत्त आहे.

वरोऱ्याकडून भद्रावती तालुक्यातील पाहुणा, धानोली या गावाकडे विद्यार्थी हिरालाल लोया विद्यालय वरोरा चे विद्यार्थी घेऊन जाणारी एम एच 40 बी ई 1847 क्रमांकाच्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकी क्र. एम एच 34बी वाय 5453 या दुचाकीला धडक दिल्यानंतर विद्यार्थी बसलेल्या कारने दोन -तीन पलट्या मारल्या यामध्ये श्रद्धा गजानन डोळस वय 17,सुहानी निरंजन बेंदले वय 16 वर्ष, अनुष्का बंडू ठावरी वय 17 वर्ष, उर्वशी दातारकर वय 17 वर्ष हे सर्व विद्यार्थिनी रा पाहुणा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवाशी आहे, दोन विद्यार्थ्यांना खाजगी दवाखान्यात उपचारर्थ भरती केल्यामुळे त्यांची नावे कळू शकली नाही. असे एकूण सहा विद्यार्थी अपघातात जखमी झाले आहे.

दुचाकी स्वार भारत वामन जिवतोडे हे खुटाला येथून आपल्या मुलाला प्रकुर्ती बरी नसल्यामुळे उपचारासाठी वरोरा येथे दवाखान्यात नेत असताना विद्यार्थी बसून असलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे भारत जिवतोडे वय 42 वर्ष, आणि मुलगा वेदांत भारत जिवतोडे वय 12 वर्ष हे दोघेही जखमी झाले त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालया वरोरा येथे उपचार सुरु आहे. मात्र दुचाकी भारत जिवतोडे यांचा भाचा हिमांशू चौधरी चालवीत होता असे कळते.अपघातात जीवितहानी झाली नाही.घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.