Home Breaking News Varora taluka@news • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ समित वरोरा विधानसभा क्षेत्र समिती...

Varora taluka@news • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ समित वरोरा विधानसभा क्षेत्र समिती अध्यक्षपदी रमेश राजूरकर व त्रिशुल घाटे, अमित गुंडावार यांची सदस्यपदी निवड

534

Varora taluka@news
• ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’  वरोरा विधानसभा क्षेत्र समिती अध्यक्षपदी रमेश राजूरकर व त्रिशुल घाटे, अमित गुंडावार यांची सदस्यपदी निवड

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : शासन निर्णयान्वये महिलांचे आरोग्य व पोषणसाठी त्यांच्या आर्थिक स्वालंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यसाठी परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करने आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सूरू करण्यात आलेली आहे.
शासन निर्णयानव्ये सदर योजने अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुकावाही स्तरीय अशासकीय सदस्यांची समिती ऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत केली. सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला. यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील या तिन्ही अशासकीय सदस्यांची निवड जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मार्फत करण्यात आली आहे. सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलेले आहेत.
वरोरा विधानसभा क्षेत्र रमेश राजूरकर अशासकीय सदस्य, पालकमंत्री चंद्रपूर यांचे मान्यतेने अध्यक्ष, त्रिशूल घाटे, अमित गुंडावार सदस्य, हे दोन्ही अशासकीय सदस्य, पालकमंत्री यांचे मान्यतेने, तहसीलदार सदस्य, गटविकास अधिकारी सर्व संबंधित विधानसभा सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी सदस्य, शरद पारखी, बालविकास प्रकल्प अधिकारी वरोरा सदस्य -सचिव या सात सदसयीय समितीला सदर वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रानिहाय त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार देण्यात आले.

शासनाचा स्तुत्य उपक्रम असून, विधानसभा क्षेत्रातील महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजने अंतर्गत सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली किंवा नाही, कोणतीही लाडकी बहीण सदर योजनेपासुन वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेणार आहे.