Home Breaking News Varora taluka@news • दोन भावंडाच्या गोठ्याला आग आगीमध्ये एका बैलाचा आगीत होरपळून...

Varora taluka@news • दोन भावंडाच्या गोठ्याला आग आगीमध्ये एका बैलाचा आगीत होरपळून मृत्यू • तीन बैल जखमी शेती अवजारे आणि चारा आगीच्या भक्षस्थानी

24

Varora taluka@news
• दोन भावंडाच्या गोठ्याला आग आगीमध्ये एका बैलाचा आगीत होरपळून मृत्यू

• तीन बैल जखमी शेती अवजारे आणि चारा आगीच्या भक्षस्थानी

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा :वरोरा तालुक्यातील पाचगाव (ठाकरे ) येथे 11 आगस्ट 2024 ला मध्यरात्रीनंतर गोठ्याला आग लागून एका बैलाचा मृत्यू व तीन बैल जखमी तसेच शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाल्याची घटना 12 आगस्ट ला पहाटे उघडकीस आली.मच्छर उत्पाद असल्यामुळे जनावरांना त्रास होऊ नये यासाठी शेकोटी लावली होती. त्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
दोन्ही भावांचे गोठे लागूनच असल्यामुळे आगीमध्ये जनार्धन शेंडे यांचे सुमारे 1लाख 50हजार रुपये, आणि दुसरा शेतकरी बंधू वासुदेव शेंडे यांचे सुमारे दिड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.सदर आगीमध्ये शंकर बबन केदार यांचाही गोठा या आगीत सापडला.त्यांच्याही गोठ्यातील जानावरांचे वैरण, शेती अवजारे, रासायनिक खत, लाकडी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत त्यांचे अंडाजे 70 हजाराचे नुकसान झाले आहे. तिन्ही शेतकऱ्यांचे जवळपास 4लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

मध्यरात्रींनंतर आग लागल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते किशोर मधुकर डुकरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तहसीलदार योगेश कौटकर आणि अग्निशमन दलाशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आणि आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविले. आग आटोक्यात येईपर्यंत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.शेतीचे हंगामात शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच विद्यमान संचालक राजू चिकटे यांनी घटनेची दखल घेऊन ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्याची माहिती आहे. सदर प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पीडित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.