Home Breaking News Gadchiroli dist@News •वाढती बेरोजगाराची समस्या दूर करणे हेच आपला ध्येय:मंत्री डॉ धर्मराव...

Gadchiroli dist@News •वाढती बेरोजगाराची समस्या दूर करणे हेच आपला ध्येय:मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम •आलापल्ली येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न

76

Gadchiroli dist@News
•वाढती बेरोजगाराची समस्या दूर करणे हेच आपला ध्येय:मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम

•आलापल्ली येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

अहेरी:एकेकाळी आदिवासीबहुल,नक्षलग्रस्त व उद्योग विरहित जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख होती. मात्र,गेल्या पाच वर्षांपासून हळूहळू आपल्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग व्यवसाय उभारी घेत आहेत.विविध नामांकित कंपन्या जिल्ह्यात येऊ लागल्या आहेत.यासह आदी कंपन्यांमध्ये येथील बेरोजगार युवक,युवतींना नोकरी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून वाढती बेरोजगारीची समस्या दूर करणे हेच आपला असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

रविवारी (१८ ऑगस्ट) रोजी आलापल्ली येथील क्रीडा संकुल परिसरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्याचे उदघाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम, माजी प.स.सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश,उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, नियोजन समिती सदस्य नाना नाकाडे,ऋषिकांत पापडकर,युनूस शेख,अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी,भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे,एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे,अहेरीचे गटविकास अधिकारी राहुल वरठे,एटापल्लीचे गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे,सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हवी तशी नोकरी न मिळाल्याने जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वांनाच चरितार्थ चालवताना पैशांची गरज भासते. पण ती गरज सोडवताना नोकरी अर्थात कामाच्या संधी सध्याच्या काळात मिळत नाहीत. त्यामुळेच शिक्षण,सिंचन आणि रोजगार हे ब्रीदवाक्य घेऊन आपण निवडणुकीला सामोरे गेलो आणि लोकांनी भरभरून प्रेम दिला.दिलेलं शब्द पाळण्यासाठी आपला सतत प्रयत्न सुरू असून या भागातील प्रत्येक युवक, युवती स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी हा भव्य रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात जवळपास ३४ कंपन्यांना पाचारण करण्यात आले आहेत.या विविध कंपन्यांमध्ये जवळपास १२ हजार ५०० बेरोजगार युवक-युवतींना आपापल्या स्किलनुसार टप्प्याटप्प्याने काम दिले जाणार आहे. त्यामुळे या रोजगार मेळाव्याचा पुरेपूर लाभ घ्या असे आवाहन त्यांनी केले.एवढेच नव्हे तर गेल्या पंधरा वर्षात जे काम राज्यमंत्री पदावर असताना मी करू शकलो नाही ते या पदावर आल्यावर केले आहे. त्यामुळेच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. म्हणून माझ्यावर टीका करण्याचे काम करीत आहेत. मात्र टीका केल्याशिवाय काम देखील करता येत नाही. त्यामुळे विरोधकांनी अशीच टीका करत राहावी मी लोकहिताचे काम करत राहणार असल्याचे सांगत त्यांनी चिमटेही घेतले.

या भव्य रोजगार मेळाव्यात जवळपास १० ते १२ हजार बेरोजगार युवका-युवतींनी हजेरी लावली होती.मेळाव्यात लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला.आयोजकांकडून जेवण आणि पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी केले, रोजगार संदर्भात विस्तृत माहिती को-ऑर्डिनेटर तस्मिया शेख यांनी दिली तर सूत्रसंचालन पूर्वा दोंतुलवार यांनी सांभाळले.

*काही उमेदवारांना मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप*
केवळ या नामांकित कंपन्यांमध्येच नव्हे तर कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यात आली. युवकांना नियुक्तीपत्र देत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर मुलाखत दिलेल्या अर्जकर्त्या उमेदवारांना पुढील काही दिवसातच भ्रमणध्वनी द्वारे पाचारण करून त्यांना विविध क्षेत्रात नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.पुणे पासून तर आलापल्ली पर्यंत विविध कंपन्यांमध्ये सुशिक्षित युवक युवतींना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे तस्मीया शेख यांनी सांगितले आहे.