Home Breaking News Ghugus City @News •ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महेश रत्नपारखी यांचा सत्कार

Ghugus City @News •ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महेश रत्नपारखी यांचा सत्कार

194

Ghugus City @News
•ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महेश रत्नपारखी यांचा सत्कार

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी

घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महेश बबन रत्नपारखी यांचा भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महेश रत्नपारखी यांनी सेवा दिली आहे. नुकतीच महेश रत्नपारखी यांची छत्रपती संभाजीनगर येथे जलसंधारण विभागाचे कॅनल निरीक्षक या पदावर निवड झाली आहे.

त्याअनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी नवनियुक्त कॅनल निरीक्षक महेश रत्नपारखी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पेढा भरवून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

यावेळी संदीप तेलंग,उमेश दडमल, राहुल मेश्राम,गणेश राजूरकर,स्वाती गंगाधरे, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार,शितल कामतवार व कर्मचारी उपस्थित होते.