Home Breaking News Korpna taluka News  • नारंडा गावात होत आहे दारूची सर्रास विक्री

Korpna taluka News  • नारंडा गावात होत आहे दारूची सर्रास विक्री

45

Korpna taluka News 
• नारंडा गावात होत आहे दारूची सर्रास विक्री

सुवर्ण भारत:मनोज गोरे
उपजिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

कोरपना:तालुक्यातील नाराडा या गावात अनेक वर्षांपासून चार व्यक्ती गावात अवैध दारूचा व्यवसाय करीत असून गावातील शाळा कॉलेजचे मुलं, मुली,महिलांवर यांचा दुष्परिणाम होत असून अनेक युवक दारूच्या आहारी जात आहे. त्यामुळे गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्यात यावे याकरिता कोरपना पोलीस स्टेशन येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तीखट यांनी निवेदनाद्वारे मागणी केली असून या मागणीची दखल संबंधित विभाग यांनी घेऊन ही होणारी नाराडा येथील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन करनार मंगेश तिखट यांनीनिवेदन दिले.

गावातील ग्रामपंचायत यांना सुद्धा निवेदन या अगोदर दिले मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असून गावातील विकास करणाऱ्या संस्थेलाच गावात अवैध दारू विक्री पसंत आहे की काय असा प्रश्न जनसामान्यांमध्ये भेडसावला जात आहे. गावाच्या विकास होत असल्याचे ग्रामपंचायत मोठ्या थाटामाटात कार्यक्रम सादर केले जातात मात्र गावातील अवैद्य दारू विक्री कडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मंगेश तिखट यांनीआरोप केले .तेव्हा ग्रामपंचायत याकडे लक्ष देतील काय याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक पोलीस स्टेशन यांना मंगेश तिकीट यांनी गावातील अवैध धंदे करणाऱ्यांची नावे सुद्धा देऊन याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. नुकताच 18 ऑगस्ट रोज रविवारला सायंकाळी सहा वाजता कोरपणा पोलीस स्टेशनला निवेदन दिले.मात्र संबंधित पोलीस विभागांच्या पोलिसांकडून अवैद्य धंदे करणाऱ्या व्यक्तींना व्हाट्सअप द्वारे निवेदन त्या व्यक्तींना पोहोचतेय? यामागचे नेमके कारण काय याला पोलीसच सहकार्य करीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

चंद्रपूर  जिल्हा पोलिस अधीक्षकांना सुद्धा निवेदन देणार असल्याचे मंगेश तिखट यांनी सांगितले या अगोदर निवेदन दिले होतेत मात्र काही दिवसच दारू बंद राहिली परत त्याच दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीला सुरुवात केलीत ही होणारे अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून पोलीस नाराडा येथील दारू बंद करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले.

20 ऑगस्टला नव्याने तंटामुक्ती समितीचे अध्यक्षांची निवड होणार असून नवनियुक्त अध्यक्षांनी गावातील अवैद्य चालणारे व्यवसाय बंद करून गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात यावी अशी अपेक्षा नाराडा ग्रामस्थ यांच्या कडून व्यक्त केली जात आहेत.

…. नवीन होणारा अध्यक्ष कोण होतील हे मात्र अजून निश्चित झालं नसलं तरी त्या व्यक्तींनी गावातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करून गाव हा विश्वासाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा या नुसार गावाचे कार्य व्हावे मंगेश तिकिटे यांनी गावातील सर्व सामान्य जनतेचे हिताचा मोठा निर्णय घेतल्याने गावात गावात होणारी अवैद्य व्यवसाय बंद व्हावे याकरिता पाऊल उचलले असून गावातील अवैध व्यवसाय बंद होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

वरिष्ठांसोबत पत्रव्यवहार करून गावातील व्यवसाय बंद करू व गावाकरिता आंदोलनही करून गावातील अवैध व्यवसाय बंद करणार असल्याचे मत व्यक्त केले.