Home Breaking News Varora taluka News • आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव...

Varora taluka News • आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

25

Varora taluka News
• आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

सुवर्ण भारत: खेंमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सत्र 2023-24 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 5सप्टेंबर 2024 ला शिक्षक दिनी संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आनंद माध्यमिक विद्यालय, व्यवस्थापन कमेटी चे उपाध्यक्ष तथा महारोगी सेवा समिती आनंदवन चे विश्वस्त सुधाकर कडू सर हे होते.प्रमुख अतिथी आ.मा. वी चे सदस्य तथा संधी निकेतन अपंगाची कर्मशाळा चे अधीक्षक रवी नलगिंटवार सर,अ. मा. वी. चे सदस्य दीपक शिव सर,शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांची उपस्थिती होती.
गुणगौरव सोहळ्यात प्रथम आर्या लोहकरे,द्वितीय ऋतुजा जांभुळे,तृतीय प्रियंका महाकाळकर ह्या विद्यार्थिनींना रोख स्वरूपात बक्षीस व मोमेंटो तथा जेष्ठ समाजसेवक आदरणीय डॉ. विकास आमटे लिखित ‘आनंदवन प्रयोग वन ‘पुस्तक भेट देण्यात आले. तसेच विषयानुसार सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना विषय शिक्षकांकडून प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा देण्यात आली.
गुणगौरव सोहळ्यामध्ये सुधाकर कडू,रवी नलगिंटवार, दीपक शिव यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर कडू यांनी विचारमंचवरून आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, काळ बदलला आहे पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मुले शिकतात, गुण मिळवितात, सर्वात शेवटी आनंद म्हणजे टानिक असते.

आपण आपले जेवण थांबवून जेवणापेक्षा पास झाल्याचा आनंद मोठा समजून साजरा करीत असतो. पालक मुलाला शाळेत घालतो खूप अपेक्षा असतात आई -वडिलांच्या,नापास झाले की त्यांना दुःख होतात.म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्याला अभ्यासात काय अडचणी येतात त्या शिक्षकांना सांगितल्या पाहिजे. तुम्हाला येत असेल तर शिक्षक पुढे धावत असतो. आपले शिक्षक आणि आई -वडील हे गुरु आहे. त्यांचा आदर्श समोर ठेऊन आपला विद्यार्थी जीवनाचा प्रवास हा सुरु ठेवला पाहिजे. श्रद्देय बाबा आमटे प्राथमिक शाळेत असताना त्यांची आई लक्ष्मीबाई यांनी बाबांना एक जर्मनी बाहुली दिली होती. ती बाहुली पडायची आणि उभी राहायची कारण तिला स्प्रिंग होता. लक्ष्मीबाई बाबांना म्हणायच्या की जीवन असेच असते आपल्याला सावरुन उभे व्हावे लागते. जीवनात कधी यश येतात कधी अपयशयही येतात. सर्व संकटावर मात करून आपण आपले ठरलेले ध्येय गाठतो. बाबा आमटेनी आनंदवनात श्रमाची दिक्षा दिली आहे. श्रमाने जीवनात आनंद निर्माण होत असतो असे विचार सुधाकर कडू यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा विचारमंचावरून मांडले.

कार्यक्रमात रवी नलगिंटवार यांनी आपल्या भाषणात मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची नावे विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता प्राप्त बोर्डावर झळकली तशीच नावे यावर्षाला सुद्धा झळकली पाहिजे. याच शाळेची विद्यार्थिन पूनम बगडे ही 12 वी झाल्यानंतर बीएएमएस ला गेली ती डॉक्टर होणार! ही अभिमानास्पद बाब आहे.याच पूनमचा रेकॉर्ड यावर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तोडला पाहिजे. शाळेत उत्तम शिक्षण आपल्याला मिळत आहे.शाळेनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. ही सुद्धा आनंदाची बाब आहे. असे विचार रवी नलगिंटवार सरांनी मांडले.
दीपक शिव सरांनी आपले विचार प्रगट करताना म्हणाले की गुरुशिवाय मार्ग नाही. उत्तम शिक्षक असून जीवनाची प्रगती करण्यासाठी चांगली गोष्ट आपल्याला शाळेत मिळत आहे.

निसर्ग आपल्या जवळ असून खूप काही गोष्टी निसर्गच आपल्याला शिकवित असतो. पृथ्वी आपल्याला सहनशीलता शिकवितो, वारा चपळता, आकाश स्थिर राहण्यास शिकवितो तर पाऊस, पाणी समानता शिकवितो आहे. आणि अग्नी तेजस्वी व्हायला शिकविते. आनंदवन प्रयोग वन शिकवितात आम्ही छोटे आहो, नाही मिळाले तरीसुद्धा समाधानी असतो. ज्यांचेकडे खूप काही आहे. ज्ञान नसतील ते अनुभवाचे क्षमतेवर ती माणसे आकाशाला गवसणी घालतात. ज्ञान वाया जात नाही. शिक्षणाबरोबर खेळ सुद्धा महत्वाचा आहे. शाळेतील सर्व शिक्षक चांगले असून शिक्षण सुद्धा चांगले आहे. असे विचार दीपक शिव सरांनी मांडले.

मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांनी शिक्षक दिनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक आशिष येटे सरांनी तर आभारप्रदर्शन सहा. शिक्षक हर्षल चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.