Home Breaking News Varora/bhadravti • कर्जमाफी साठी वरोऱ्यात प्रहार संघटनेचा टेंम्भा आंदोलन

Varora/bhadravti • कर्जमाफी साठी वरोऱ्यात प्रहार संघटनेचा टेंम्भा आंदोलन

18

#Varora/bhadravti
• कर्जमाफी साठी वरोऱ्यात प्रहार संघटनेचा टेंम्भा आंदोलन

सुवर्ण भारत:राजेश येसेकर
तालूका प्रतिनिधी भद्रावती / वरोरा

भद्रावती / वरोरा : निवडणुकीच्या आधी सत्तेत असलेल्या महायुतीतील नेत्यांनी आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्याच्या सातबारा कोरा करू असे आस्वासन दिले होते. परंतु सरकार स्थापन होऊन १०० दिवसाचा काळ होऊन सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून पर्यंत करण्यात आली नाही.या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीतील  आमदाराच्या घरासमोर ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले व १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रात्री १२ वाजता हातात भगवा आणि गळ्यात निळा दुपट्टा हातात मशाल घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार चंद्रपूर जिल्हा प्रमुख शेरखान पठाण यांनी सांगितले.

या मागणीचे निवेदन देण्यासाठी अतुल निमरड, आशिष रणदिवे,अमोल काटकर,गणेश उराडे, ओंकार कांबळे,बालाजी खिरटकर, ओंकार कांबळे,निखिल पाटील, अक्षय गिमेकर, गीताताई फुलकर ,स्वप्नील वावरे, आकाश येलेकर, महेंद्र भगत,योगेश फुलझले, वंदना वाढई,संदीप हुलके,  इत्यादी प्रहार सेवक उपस्तीत होते या मागणीचे निवेदन वरोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तसेच तहसीलदार यांना देण्यात आले.