Home Breaking News • आई फॉउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घुग्घुस शहरात स्वच्छता अभियान

• आई फॉउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घुग्घुस शहरात स्वच्छता अभियान

18

#Ghugus

• आई फॉउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घुग्घुस शहरात स्वच्छता अभियान

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : शहरातील आई फॉउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राम नवमी ते हनुमान जयंती प्रर्यत चालु असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत पोलिस स्टेशन पासून ते नगर परिषद ते गांधी चौक येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात. मुख्य मार्गदर्शक म्हणून वणी येथील गुणवंत पचारे यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा धारण करून शहरवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी शहरातील गुरूदेव सेवा मंडळाचे, अध्यक्ष मधुकर मालेकर आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष अमोल मांढरे , उपाध्यक्ष इरफान शेख ,प्रशांत सारोकर, तुषार बोबडे, सुभाष मांढरे सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे,संदिप जुनारकर चेतन कांबळे उपस्थित होते.
या संस्थेद्वारे वेळोवेळी अनेक सामाजिक कार्य करण्यात येत आहे.