Home Breaking News #Kolhapur • “त्या “अतिरेक्यांना भर चौकात फाशी द्या! • कोल्हापूर ग्राहक समितीची...

#Kolhapur • “त्या “अतिरेक्यांना भर चौकात फाशी द्या! • कोल्हापूर ग्राहक समितीची मागणी! • नायब तहसिलदारांना मागणीचे निवेदन सादर!

87

#Kolhapur
• “त्या “अतिरेक्यांना भर चौकात फाशी द्या!
• कोल्हापूर ग्राहक समितीची मागणी!
• नायब तहसिलदारांना मागणीचे निवेदन सादर!

सुवर्ण भारत : किरण घाटे (संपादक)

कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करीत हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना कोल्हापूर ग्राहक समितीच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी या वेळी ग्राहक समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे एक निवेदन करवीरचे नायब तहसिलदार भालचंद्र यादव यांना देण्यातआले. निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड, महाराष्ट्र अध्यक्ष मुश्ताक मिस्त्री, उपाध्यक्ष मनोहर लोहार. महाराष्ट्र संघटक कुमार पाटील. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दगडू खोतसाहेब महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी पराडकर, अपर्णा पाटील या शिवाय अमोल पराडकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.