महाकाल कावड यात्रा चे आयोजन
वरोरा :- गतवर्षी चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच ही महाकाल कावड यात्रा काढण्यात आली होती. यंदाही जागृती फाउंडेशन प्रणीत महाकाल कावड यात्रा समिती तर्फे कावड यात्रेचे आयोजन दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी दुसऱ्या श्रावणी सोमवारला करण्यात आलेले आहे.
श्रावण महिन्याच्या पावन निमित्ताने दुसरा श्रावणी सोमवार दिनांक 24 ऑगस्टला सकाळी 9:00 वाजता डां.आंबेडकर चौक येथे पूजा अर्चना करून ही महाकाल कावड यात्रा निघणार आहे. ही पायदळ यात्रा डॉ.आंबेडकर चौक- सपाटे चौक -शहीद स्मारक चौक -रत्नमाला चौक -आनंदवन चौक -चिमूर रोड मार्गे खैरगाव- परसोडा -रान तळोधी -खतोडा – सालोरी नंतर भटाळा येथे विदर्भातील सर्वात मोठी शिवलिंग असलेल्या मंदिरात जाणार आहे. असे मार्गक्रमण करीत जाणार आहे. वरोरा ते भाटाळा या मार्गक्रमणामध्ये ठिकठिकाणी अनेक ठिकाणी समाजसेवक तसेच संस्था तथा शिवभक्तांद्वारे या कावड यात्रेमध्ये जाणाऱ्या भक्तांसाठी पाणी,निंबू पाणी, चहा,फराळाचे स्टाल लावण्यात येणार आहे. भाटाळा शिवमंदिर येथे गंगा, नर्मदा, शिप्रा,गोदावरी इत्यादी पवित्र नद्यांचे जल घेऊन भगवान महादेवांच्या पवित्र शिंगलिंगाचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.त्यानंतर भवानी माता मंदिरात भवानी मातेची ओटी भरून यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.
या कावड यात्रेमध्ये महिला,पुरुष, मुले, मुली तसेच सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाकाल कावड यात्रा समितीने केलेले आहे.




