Home Breaking News कारची काच फोडून अडीच लाखाची रोकड़ पळविली.

कारची काच फोडून अडीच लाखाची रोकड़ पळविली.

7

कारची काच फोडून अडीच लाखाची रोकड़ पळविली.

वरोरा : शहरातील आंबेडकर चौक येथे गुरुवारी भर दिवसा एचडीएफसी बँकेसमोर उभ्या असलेल्या स्कार्पिओ कारची काच फोडून अडीच लाख रुपयाची रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली या घडलेल्या प्रकारामुळे शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजरी येथील निलेश नथुजी भेले हे प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतात गुरुवारी आपली स्कार्पिओ गाडी घेऊन आंबेडकर चौकात एचडीएफसी बँकेत धनादेश जमा करण्याकरिता आले होते त्यांनी आपली कार उभी करून अडीच लाख रुपये रोकड असलेली बॅग गाडीमध्ये ठेवून बँकेत गेले काही वेळाने परत आले असता कारची समोरील काच फुटलेली दिसली आणि पैशाची बॅग गायब असल्याचे दिसून आले

त्यानंतर बेले यांनी वरोरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
भर दिवसा आणि वरदळीच्या ठिकाणावर कारची काच फोडून रक्कम लंपास केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून या घडलेल्या घटनेमुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातआहे.
वरोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली व पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.