Home Breaking News अकारण फिरणाऱ्यांवर खामगाव पोलिसांचा जालीम उपाय; हा पॅटर्न राज्यात राबवा!

अकारण फिरणाऱ्यांवर खामगाव पोलिसांचा जालीम उपाय; हा पॅटर्न राज्यात राबवा!

77

खामगाव – राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे. यासाठी प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शनिवार १७ एप्रिल रोजी पोलिस, नगर परिषद व आरोग्य प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना टेस्ट करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
राज्यासह बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लॉकडॉन करण्यात आले असून अत्यावश्ययक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. सोबतच कलम १४४ लागू केलेली असून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असून यामुळे शहरात मोठी गर्दी होवून कोरोना रूग्ण वाढत आहेत. दरम्यान शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर व नगर परिषद पथकाने रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांनी पकडून त्यांची येथील महात्मा गांधी उद्यान येथे कोरोना चाचणी केली व दंडात्मक कारवाई केली.  १७ एप्रील रोजी सकाळपासूनच पोलिसांनी शहर पोस्टेसमोर मोहिम राबवून दुपारपर्यंत जवळपास २५० नागरीकांची चौकशी करून त्यांची कोरोना चाचणी करत दंड आकारला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत चालला आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाने शहरात कारवाईची मोहिम राबविली आहे. सोबतच ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी स्वता पथकासह शहरात फिरून रस्त्यांवर दुकान लावणाऱ्या, परवणगी नसताना दुकान सुरू ठेवणाऱ्या व पार्सल सुविधेची परवाणगी असतानाही गिऱ्हाईक बसवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पकडून शहर पोस्टेला आणले. यावेळी त्यांच्या दंडात्मक व कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली

खामगाव पोलीस पॅटर्नची चर्चा
ज्यांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी 6 जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आहे. पोलिसांनी ही मोहीम राबवली म्हणून ते ट्रेसिंग झाले नाही तर गावभर कोरोना पसरवत फिरले असते. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आवर घालण्यासाठी सुरू केलेला हा खामगाव पॅटर्न सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला असून खामगाव पोलिसांचे कौतुक होत आहे तर खामगाव पोलीस पॅटर्नची दखल घेवून राज्यात अशी मोहीम सुरू करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे.