Home Breaking News बापरे चोवीस तासात 12 मृत्यू : खामगावमध्ये 7 दगावले ;आज 858 रुग्ण

बापरे चोवीस तासात 12 मृत्यू : खामगावमध्ये 7 दगावले ;आज 858 रुग्ण

88

बुलडाणा: जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 858 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
20 एप्रिल काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे. 1 मे पर्यत लॉकडाऊन वाढवून देण्यात आले आहे.

कोरोनाने रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत असली तरी आता प्रत्येकाने आत्मचिंतन करुन वागणं गरजेचे आहे। स्वतः ची काळजी घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतः ला संसर्ग होणार नाही ह्याबाबत दक्षता घेणे हाच एक उपाय आता आपल्या आहे. त्यासाठी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडणे,
अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर निघालेच तर तोंडाला मास्क, गर्दीत न जाणे आणि सॅनिटायझर व साबनाणे हात स्वच्छ ठेवणे ही त्रिसुत्री पाळणे आवश्यक आहे.
विचार करा..आपली एक चूक घरात कोरोना व त्यासोबतच मृत्यू आणू शकते. गेल्या दोन दिवसात 12 जण दगावले आहेत. तर खामगाव येथील मृतक 17 ते 20 एप्रिल या कालावधीत आहेत.