Home Breaking News तळीरामांसाठी गुड न्युज : मद्य व जेवणाची होम डिलिव्हरी सुरू

तळीरामांसाठी गुड न्युज : मद्य व जेवणाची होम डिलिव्हरी सुरू

76

 

खामगाव : बार मधून होम डिलिव्हरी पद्धतीने मद्य विक्रीसाठी राज्यात काही शहरात परवानगी मिळाली आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये आज मंगळवारी ( ता.२०) सुध्दा अशी परवानगी दिली  गेली  आहे. खामगाव मध्ये मद्य व जेवणाची घरपोच सेवा सुरू झाली आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळातच ही सेवा मिळेल.

१७ एप्रिल रोजी पुणे महापालिकेने मद्य विक्रीच्या दुकानांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पालिकेने हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा (सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत) सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  दरम्यान सरकारने राज्यात काही ठिकाणी होम डिलिव्हरी पद्धतीने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

बार मालकांना ठराविक वेळेत होम डिलिव्हरी पध्दतीने मद्य विक्री करता येणार आहे. त्यासाठी कोरोना बाबतीत सर्व नियम पाळावे लागणार आहेत. जे कर्मचारी होम डिलिव्हरी करतील त्यांची आधी कोरोना टेस्ट आवश्यक असून सॅनिटायझेजन व आवश्यक सर्व बाबीची पूर्तता केल्यावरच अशी परवानगी दिली गेली आहे.

१४ एप्रिल पासन लॉक डाऊन लागल्यावर बार व दारू दुकाने बंद आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्री होत असून त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागत आहे, तर होम डिलिव्हरी सेवा सुरू करावी अशी मागणी बार मालक करत होते, त्यानुसार काही शहरात ही सुविधा सुरू झालीली असून बुलडाणा जिल्ह्यातील काही शहरात अशी परवानगी दिली गेली आहे. आजपासून खामगाव मध्ये अशी सेवा सुरू झाली आहे. ग्राहकांना बार मधून जेवणाची व दारुची होम डिलिव्हरी आता मिळणार आहे.