Home Breaking News दोन जिवंत नवजात बालकांना मरण्यासाठी फेकून निर्दयी जन्मदाते फरार! मुंग्या, माकोडे...

दोन जिवंत नवजात बालकांना मरण्यासाठी फेकून निर्दयी जन्मदाते फरार! मुंग्या, माकोडे चावले, दोन्हीही बालक सुखरूप

81

 

बुलडाणा: मूळ बाळ झालं पाहिजे म्हणून एकीकडे नवस केले जातात तर दुसरीकडे मात्र काही निर्दयी जन्मदाते आपल्या पोटच्या गोळ्याला मरण्यासाठी फेकून देतात, अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या दोन घटना बुलडाणा जिल्ह्यात घडल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात काल 28 ऑगस्टला आणि आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस नवजात बालक आढळल्याच्या धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हाभर विविध चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळे आता मानवी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. गेल्या चोवीस तासात बुलडान्यातील जळगाव जामोद व मलकापूर शहरातील परिसरात दोन बेवारस नवजात शिशू आढळल्याने नागरिकांमध्ये राग व्यक्त केला जात आहे.

काल सकाळी जळगाव जामोद शहरानजीक एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बेवारस परिस्थितीत फेकून दिलेलं स्त्री जातीचं नवजात अर्भक शेतात जाणाऱ्या महिलांना दिसून आलं होतं. पोलिसांनी तात्काळ या बाळाला प्रथम जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर खामगाव सामान्य रुग्णालयात भरती केलं.

तर जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा नोंद करून या बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू केला आहे. या घटनेला 24 तास उलटत नाही. तोच आज सकाळी मलकापूर शहरातील एका बंद पडलेल्या कोविड सेन्टर च्या मागच्या निर्जन जागी ड्रेनेज टॅंक मध्ये मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांना रडण्याचा आवाज आल्याने, जाऊन पाहिलं असता एक पुरुष जातीचं नुकतंच जन्माला आलेलं बाळ बेवारस आढळून आलं. या बाळाला तात्काळ मलकापूर सामान्य रुग्णालयात भरती केलं.

अशी आहे मलकापूरची घटना

मायेची ममता काय असते ते आपल्या सर्वांना माहितचं आहे-कितीही मोठं संकट आलं तरी जीवाची पर्वा न करता आई आपल्या बाळाला कुशीत सामावते… परंतु जी माता आपल्या बाळाला मृत्यूच्या वाटेवर सोडून पसार होत असेल, तिला काय म्हणावे ? मायेची ममता काय असते कदाचित तिला हे माहीतच असाव,अशा निर्दय मायने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यू च्या वाटेवर सोडल्याने मायेच्या ममतेला काळीमा फासला गेला आहे, कदाचित अनैतिक संबंधाच्या विकृतीची काळी किनार या घटनेला असावी…अर्थात देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय मात्र याठिकाणीही आला… रामपहाऱ्यातच अंधारात उघड्यावर आणि जंगली श्वापदांच्या सावटाखाली असूनही पुरुष जातीचे हे बाळ वाचले… काळीज हेलावणारी ही घटना आज सकाळी मलकापूर मध्ये उघडकीस आली. बुलडाणा रोडवरील धारीवाल-छोरीया ईंटर नॅशनल स्कुल आवारातील नालीच्या चेम्बर मध्ये हे नवजात बाळ सोडून देण्यात आले होते. सकाळी सहा वाजेदरम्यान शेतात काम करत असतांना सुरेश नामदेव उमाळे रा.पंचमुखी नगर मलकापुर यांना लहान बाळ रडण्याचा आवाज ऐकु आल्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता ते बाळ जिवंत असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अमरसिंह राजपूत यांना बोलावून ते दाखविले , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांना राजपूत यांनी घटनेची माहिती दिली, ठोसर यांनी शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांना भ्रमणध्वनी कळविले, पत्रकार गजानन ठोसर, नारायण पानसरे,श्रावण पानसरे,गणेश तायडे, विजय वर्मा, दिपक ईटनारे,ज्येष्ठ पत्रकार हनुमान जगताप, पो.हे.काॅ आनंद माने,पो.हे.काॅ संतोष कोल्हे,पो.काॅ.उमेश वाघ,पो.काॅ.राहुल वाघ,पो.काॅ.ईश्वर वाघ घटनास्थळी दाखल झाले,चेम्बर मध्ये टाकलेल्या बालकाला मु़ंग्या माकोड्यांनी चावा घेतल्याने बालक रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते तर त्याची नाळ गळ्याभोवती गुंडाळलेल्या स्थितीत होती.
पत्रकार गणेश तायडे यांनी नवजात बालकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डाॅ.खोकले मॅडम् व त्यांच्या चमूने उपचार करुन गळ्याभोवती ची नाळ काढून कापून टाकत “त्या ” बालकाला पुढील उपचारार्थ पो.काॅ.राहुल वाघ यांचे समवेत 102 ॲम्ब्युलन्स द्वारे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशुविहार कक्षात ते बाळ सुखरूप पोहोचले असून त्याचेवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती पो.काॅ.राहुल वाघ यांनी दिली.
सुरेश ज्ञानदेव उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 317अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ठाकरे करीत करीत आहे.