Home Breaking News घरकुलासाठी अजब गजब १६ नियम ;फ्रिज व टेलिफोन असल्यास नाही मिळणार लाभ!

घरकुलासाठी अजब गजब १६ नियम ;फ्रिज व टेलिफोन असल्यास नाही मिळणार लाभ!

88

चंदू पाटील
शेगाव : शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाला प्रपत्र ड च्या नवीन घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केलेले आहेत. परंतु लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर करण्यासाठी नवीन निकषांची  अट जाहीर केलेली आहे. त्यामध्ये फ्रिज व टेलिफोन व अजून शासनाचे 16  निकष असणाऱ्या व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ देऊ नये. असे शासनाने जाहीर केलेले आहे. शासनाने घरकुल योजनेसाठी जे 16 निकष जाहीर केलेले आहेत त्यानुसार बरेच लाभार्थ्याला घरकुल मिळणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांचे 2022 पर्यंत घरकुल योजनेचे स्वप्न अपूर्णच राहणार की काय? असा प्रश्न  आश्वासन  जनतेला पडलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्वांना घरकुल योजना देण्याचे आश्वासन दिले आहे व प्रधानमंत्री घरकुल आवास योजने मार्फत बऱ्याच घरकुल योजना सुद्धा राबवल्या. परंतु आता केंद्र शासनाने राज्यातील खेडे विकास घरकुल योजनेसाठी जे 16 निकष लागू केलेले आहेत. या  निकषांमध्ये बसणाऱ्या व्यक्तींनाच घरकुल मंजूर करण्याचे आदेश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमार्फत पंचायत समितीला शासनाने दिलेले आहेत. या  निकषांमुळे बरेच घरकुल लाभार्थी शासनाच्या घरकुल योजनेपासून अपात्र ठरतील. आता फ्रिज आणि टेलिफोन ही प्रत्येक व्यक्तीची गरज झालेली आहे त्यामुळे या वस्तू जर जवळ असल्या तर झोपडीधारकांना सुद्धा घरकुल मिळेल की नाही हा मोठा प्रश्न उद्धवला आहे. त्यामुळे 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे मोदींचे आश्वासन खोटे ठरत आहे. पात्र लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या मंजूर यादीतून रद्द केल्या जात आहेत. मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचे नाव ग्रामसभेने शासनाच्या निकषांवरून रद्द केल्यामुळे गावात ग्रामसभेत वाद होत आहेत. यादीतील नावे रद्द करण्याचे खापर ग्रामसभे वरच फोडल्या जात आहे.

तर हजारो अर्ज होतील अपात्र

केंद्र शासनाने घरकुलांसाठी जे 16 निकष लागू केलेले आहेत त्यात  बरेच लाभार्थी बसणे कठीण आहे. झोपडी धारकांकडेही  जाहीर केलेल्या निकष मधिल वस्तू असल्यामुळे झोपडीधारकांच्या सुद्धा घरकुल अर्ज फेटाळल्या जाऊ शकतो.

शासन फक्त घरकुल योजना राबवत आहे परंतु प्रत्यक्षरित्या निकष लावून लाभार्थ्यांना घरकुल योजने पासून वंचित ठेवत आहे.

विलास पाटील
रा. झाडेगाव

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

या कारणांमुळे होऊ शकते घरकुल अपात्र

पक्का घर;मयत लाभार्थी; कायमस्वरूपी स्थलांतरित; दुचाकी/तीन चाकी /चारचाकी व इतर वाहने; तीन चाकी/चार चाकी कृषी वाहने किंवा इतर यंत्र; किसान क्रेडिट कार्ड धारक(50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त लिमिट); कुटुंबात शासकीय नोकरदार/पेन्शन धारक; कुटुंबात नोंदणीकृत अकृषक व्यवसाय ; कुटुंबात दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त महिना कमी होणाऱ्या व्यक्तीचा समावेश; कुटुंबात आयकर अदा करणाऱ्या व्यक्तीचा समावेश; व्यवसाय कर अदा करणाऱ्या व्यक्तीचा समावेश; घरी फ्रिज; टेलिफोन; 2.5 एकर पेक्षा ओलिताची जास्त जमीन; पाच एकर किंवा दोन पीक घेणारी शेती; घरकुल  बांधकाम करण्यास तयार नसलेल्या व्यक्ती या कारणांमुळे होऊ शकते घरकुला अपात्र.