Home Breaking News टाकळी विरो ग्रामपंचायतचा मागासवर्गीय शेतकऱ्यावर अन्याय; नकाशावर नसतांना टाकला वहीत शेतात रस्ता!

टाकळी विरो ग्रामपंचायतचा मागासवर्गीय शेतकऱ्यावर अन्याय; नकाशावर नसतांना टाकला वहीत शेतात रस्ता!

94

 

नारायण दाभाडे / द रिपब्लिक डेस्क

शेगाव – शेगाव तालुक्यातील टाकळी विरो ग्रामपंचायत मध्ये अनागोंदी कारभार सुरू असून मागासवर्गीय शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गावालगत असलेल्या मागासवर्गीय शेतकऱ्याच्या बागायती शेतातून नकाशावर नसताना जबरदस्तीने तसेच कोणतीही संमती न घेता ग्रामपंचायतीने नियमबाह्य ठराव घेऊन रस्ता टाकला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.


शेगाव तालुक्यातील टाकळी विरो ग्रामपंचायत हद्दीत गट नंबर 163 मध्ये नवल जगदेव सावळे व जगदेव भिकाजी सावळे यांचे एक एकर शेत आहे. या शेतीतून आधीच एक जुना शेत रस्ता आहे. असे असताना ग्रामपंचायतने मनमानी पद्धतीने ठराव घेत नवल सावळे आणि त्यांचा परिवार बाहेरगावी असताना त्यांच्या शेतात रस्ता टाकला. रस्ता टाकताना आंबा, निंब अशी मोठी झाडे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तोडण्यात आली आहेत. ग्रामपंचायत ने मागासवर्गीय शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय केला असून या प्रकाराची मागासवर्गीय आयोगाने दखल घेणे गरजेचे आहे तसेच शेतीचे नुकसान झाल्याने आधीच एक लक्ष रुपयापेक्षा जास्त कर्जाचा डोंगर असलेले नवल सावळे सध्या अडचणीत असल्याने प्रशासनाने त्यांना शेतीचा मोबदला द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांच्या परिवाराकडून केले जात आहे. मन या प्रकरणातील सत्यता जाणून घेण्यासाठी आमची टीम प्रत्यक्ष टाकळी विरो ग्रामपंचायतमध्ये गेली तसेच शेत रस्त्याला जाऊन स्थळ निरीक्षण करून आली आहे. यावेळी ग्रामसेवक आर आर सावरकर यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती सुद्धा घेण्यात आली आहे.

तो ठरावच नियमबाह्य!

मागणी नुसार शेत रस्ता टाकता येतो हे खरे असले तरी त्याला सुध्दा काही नियम आहेत. मात्र सर्व नियम पायदळी तुडवून हा ठराव घेतला गेला. शेतरस्त्यासाठी शेतकऱ्यांची संमती घेतली गेली त्या त्यांना मोबदला सुद्धा दिला गेलेला नाही.

झटपट काढले बिल

ग्रामपंचायतीने गावातील ठेकेदाराच्या माध्यमातून या शेत रस्त्याचे त्याचे काम केले असून जवळपास 8 लक्ष रुपये बिल झटपट काढण्यात आले आहे प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली असता तर दोन्ही बाजूने जेसीबीने नाली खोदली गेली असून  थातुर मातूर काम झालेले आहेत त्यामुळे या रस्त्यावर खरच आठ लाख रुपये खर्च झाला का याचे ऑडिट होणे सुद्धा गरजेचे आहे.