Home Breaking News Chandrapur Dist News •बल्लारपूर विधानसभा मध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 1250...

Chandrapur Dist News •बल्लारपूर विधानसभा मध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 1250 घरकुल • शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत बल्लारपूर, मुल पोंभुर्णासाठी उद्दिष्ट्य निश्चित

33

Chandrapur Dist News
बल्लारपूर विधानसभा मध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 1250 घरकुल

• शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत बल्लारपूर, मुल पोंभुर्णासाठी उद्दिष्ट्य निश्चित

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर – जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारमुळे शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता बल्लारपूर तालुक्याकरिता 1250 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बल्लारपूर, मुल व पोंभुर्णा येथील शहरी भागात योजनेची अंमलबजावणी होणार आहे. बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा येथील गरीब व कष्टकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी ना. मुनगंटीवार सदैव तत्पर असतात. याची प्रचिती पुन्हा एकदा या निर्णयातून आली आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःच्या हक्काची घरे नाहीत. अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कच्च्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पूरत्या निवाऱ्यात राहतात. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय कार्यालयाकडून उद्दिष्ट उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेली मागणी विचारात घेता शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा व प्रकल्पनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यास शासनमान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यासाठी 1250 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

शहरी भागात 500 घरकुल

 आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने, आदिवासी विकास विभागाच्या दि. 11 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये, मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा व प्रकल्पनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, बल्लारपूर नगरपरिषद 200, पोंभुर्णा नगरपंचायत 100, मुल नगरपरिषद 200 असे शहरी भागासाठी एकूण 500 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.