Home कृषी Chandrapur@city news नगिनाबाग शाखा योग नृत्य परीवारही उतरले चंद्रपूर मनपा स्वच्छता...

Chandrapur@city news नगिनाबाग शाखा योग नृत्य परीवारही उतरले चंद्रपूर मनपा स्वच्छता अभियान स्पर्धेत! आयोजित कार्यक्रमाला गोपाल मुंदडा,मंगेश खोब्रागडे, मुग्धा खांडे, आकाश घोडमारेंसह अनेकांचा सहभाग !

149

Chandrapur@city news

• नगिनाबाग शाखा योग नृत्य परीवारही उतरले चंद्रपूर मनपा स्वच्छता अभियान स्पर्धेत!

• आयोजित कार्यक्रमाला गोपाल मुंदडा,मंगेश खोब्रागडे, मुग्धा खांडे, आकाश घोडमारेंसह अनेकांचा सहभाग !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:महानगरपालिका चंद्रपूर तर्फे सुरु असलेल्या स्वच्छता लिग 2.0 या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने शहरातील नगिनाबाग योग नृत्य परीवारने आपला सहभाग नोंदविला असल्याचे या टीमचे कॅप्टन मंगेश खोब्रागडे व शारदा मुरस्कर यांनी आज एका भेटी दरम्यान या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.स्थानिक
बनकर लेआऊट मध्ये मोकळी जागा होती .ही जागा विविध झुडूपांनी आणि दगडांनी अक्षरशः व्यापली होती.

या शाखेतील सर्व सदस्यांनी एकत्रित येवून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून ती जागा साफ केली .आजच्या घडीला ती खुली जागा चकाचक दिसू लागली आहे. एव्हढेच नाही तर त्या जागेचा उपयोग भविष्यात नागरिकांना एकाद्या चांगल्या कामासाठी होवू शकतो.

विशेषतः नगिनाबाग या योग नृत्य शाखेत एकूण 60 महिला सभासद असून एकाही पुरुष वर्गाचा सहभाग नाही. सर्व माऊलींनी हातात खराटा,फावडे,खुरपे, घमेले घेऊन या पटांगणाला साफ करण्यात आपले योगदान दिले.

दि.13 नोव्हेंबर 2022 ला या शाखेचे रितसर उद्घाटन योग नृत्याचे जनक गोपाळजी मुंदडा यांच्या हस्ते झाले. आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे मेडिकल ऑफिसर डॉ .अमोल शेरके, सिटी संयोजक गिरिराज प्रसाद, न्यायालयीन सल्लागार धनंजय तावडे, योगनृत्य प्रशिक्षक आकाश घोडमारे, शहरातील सामाजिक कार्यकर्त्या मुग्धा खांडे, व अन्य मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचालन बंडू टेकाम यांनी केले.

याच कार्यक्रमाचे निमित्ताने योग नृत्य नगिनाबाग टीम कडून एक प्रदर्शन देखिल आयोजित करण्यात आले होते त्यात महिलांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ या उपक्रमात सहभाग घेत खराब प्लॅस्टिक पासुन (उपयोगाच्या) शोभिवंत वस्तू तयार केल्या, तसेच प्लॅस्टिक रॅपर पासुन सुध्दा इत्तर अनेक वस्तू तयार केल्या होत्या.

ओल्या कचऱ्यपासून कंपोस्ट खत सुध्दा निर्मित करण्यात आले आहे.दरम्यान या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

स्वच्छता या विषयावर प्रतिभा काडे लिखित पटनाट्याचे सादरीकरण या वेळी करण्यात आले . सदरहु मोहिमेत टीमचे कॅप्टन मंगेश खोब्रागडे, केंद्र प्रमुख शारदा मुरस्कर, रेखा पाटील , नलिनी नवघरे , ॲड. प्रतिभा येरेकर धिरेंद्रकुमार मिश्रा, कवीता कोटवार, प्रमिला दुबे व इतर महिला उत्साहपूर्वक भाग घेत आहेत.

नगिनाबाग वार्डमध्ये प्लास्टिक बंदी, ओल्या कचऱ्यपासून खत तयार करणे, कचऱ्याचे नीचरण या विषयावर जनजागृती करण्याची मोहीम सध्या सुरू आहे.

स्वच्छता लीग मोहिमेअंतर्गत नगिनाबाग चमू वृक्षारोपण आणि कम्पौंड वॉल ची रंगरंगोटी सुद्धा करणार असल्याची माहिती आहेत. या शिवाय नागिनाबाग वॉर्डातील रहिवाश्यांनी उत्स्फुर्तंपणे या मोहिमेत सहभागी व्हावे अशी विनंती योगनृत्य परिवार नगिनाबाग चमूचे कॅप्टन मंगेश खोब्रागडे यांनी नुकतीच केली आहे.

सध्या तरी या टीमच्या सर्वच महिला स्वच्छता अभियान राबविण्यात अथक परिश्रम घेत असल्याचे आज प्रत्यक्षात नगिनाबाग वार्डात दृष्टीक्षेपात पडले.