Home Breaking News मुंबईच्या सिखे फाउंडेशन तर्फे विद्यार्थांना कार्यपुस्तके वितरण !

मुंबईच्या सिखे फाउंडेशन तर्फे विद्यार्थांना कार्यपुस्तके वितरण !

148

• मुंबईच्या सिखे फाउंडेशन तर्फे विद्यार्थांना कार्यपुस्तके वितरण !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:सिखे फाउंडेशन मुंबई तर्फे जिवती तालुक्यातील वर्ग १ ते ५ विच्या विद्यार्थांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या हेतुने भाषा आणि गणित विषयांच्या कार्यपुस्तिकाचे नुकतेच वितरण करण्यात आले.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून जिवती तालुक्यात सिखे मुंबई आणि शिक्षण विभाग तसेच डाएट चंद्रपूर यांच्या संयुक्तिक माध्यमातून ( TIP ) टीचर इन्होवेटर उपक्रम राबविला जात आहे. आयोजित कार्यक्रमात शिक्षकांना शिकविण्याच्या विविध पद्धती शिकविल्या जात असून, विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना अध्ययन करणे सुकर व्हावे तसेच त्यांना मूलभूत कौशल्य प्राप्त व्हावे या उद्देशाने कार्यपुस्तिका वितरण केल्या जात आहे.

या वर्षी जिवती तालुक्यातील १२८ शाळेतील विद्यार्थ्यांना वर्कबुक वितरण करण्यात आले. शिक्षण विभाग चंद्रपूर व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्तिक विद्यमाने सिखे संस्था जिवती येथे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला जात आहे.
अतिदुर्गम जिवती तालुक्याच्या गावातील प्रत्येक केंद्रामध्ये कार्यपुस्तक वितरण करण्यात आले. पाटण येथील ही एका केंद्र शाळेत कार्यपुस्तिका वितरण करण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने केंद्र प्रमुख रामा पवार व सिखे फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन डांगे आणि कोच मोहन चुकाबोटलावार, विकास नागोसे, दीपक तांबे आदीं उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक, विद्यार्थीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.