Rajura @city news
श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरण- दोषीला फाशीची शिक्षा द्या!
राजूरा भाजप महिला पदाधिकारी व सदस्यांची मागणी!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)
राजुरा:महाराष्ट्रातील वसई येथील रहिवाशी असलेल्या श्रध्दा वालकर या युवतीची दिल्लीत झालेली अमानुष हत्या आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटबंना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे महीण्यानंतर या गुन्ह्याचा छडा लागला. तदवतचं दोषीला पकडण्यात पोलिस खात्याला यश प्राप्त झाले.
श्रध्दाची निर्घुन हत्या करुन तिचे आयुष्य संपविणा-या या घटनेतील गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी काल मंगळवार दि.२२नोव्हेंबरला राजूरा भाजपच्या महिलांनी महाराष्ट्र शासनाकडे केली .दरम्यान श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे अशी देखिल मागणी याच निवेदनातून करण्यात आली आहे.
लव जिहाद विरोधात शासनाने कठोर कायदा तयार करावा ज्यामुळे तरूण मुलींना आमिष दाखवुन त्यांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही.असे देखिल याच प्रकरणाच्या अनुषंगाने या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
काल राजूराचे तहसीलदार हरीश गाडे यांचे मार्फत शासनास एक निवेदन दिले या वेळी भा.ज.पा.म. जिल्हाध्यक्ष स्वाती प्रदीप देशपांडे, विश्व हिंदू परिषद जिल्हा संयोजिका सिमा सुधाकर देशमुख माणिक महेन्द्र उपलंचीवार,प्रिती गणेश रेकलवार ,स्वरूपा रमेश झंबर, सिमा सुधाकर देशमुख,निता श्रीकांत देशमुख ,अनुष्का आशिष रैंच,शुभांगी सुरेश रागीट ,नम्रमा निलेश खोंड ,
शितल राजेश वाटेकर,मीरा गजानन कुळकर्णी ,शांता बापूराव कदम ,प्रतिभा प्रदीप भावे, सीमा मिलींद देशकर आदीं महिला पदाधिकारी व सदस्यां उपस्थित होत्या .