Chandrapur@ taluka news
सिएसटीपीएसच्या राख वाहिनीतील राख गळती थांबविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करा :आ. किशोर जोरगेवार..!
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपुर:सिएटीपीएसच्या राख वाहिनीतुन राखेची गळती होत असल्याने लगतच्या नागपूर(छोटा), विचोडा, चारगाव, मोरवा, ताडाळी, पडोली येथील शेती प्रभावीत होत असुन शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देत राख वाहिनीतील राख गळती थांबविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांना केल्या आहे. सोबतच पावसाळ्यात छोटा नागपूर आणि विचोडा येथे उद्भवणा-या पुर परिस्थिती बाबतही उपायोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्या आहे.
सिएसटीपीएसच्या राख वाहिनी लगत असलेल्या गावातील गावकऱ्यांनी आपल्या तक्रारी चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांच्याकडे केल्या होत्या. या संदर्भात आमदार जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी सदरहु सुचना केल्या आहे. या बैठकीला सिएटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, कार्यकारी अभियंता उरकुडे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी माजी नगर सेवक बलराम डोडाणी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामिण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, छोटा नागपूरचे ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाढई, विचोडा ग्रामपंचायत सदस्य बंडू रामटेके, संजु बोबडे, महादेव पिंपळकर, हरी वसींग, लहु रासेकर आदींची उपस्थिती होती.
मौजा छोटा नागपूर विचोडा, चारगाव, मोरवा, ताडाळी, पडोली येथील शेतकऱ्यांच्या शेतीलगत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची नवीन राख वाहीणी आहे. सदर राख वाहीनीतुन राख गळती होत असल्याने शेतालगत राखेचा ढीग लागला आहे. या राखेच्या ढिगाऱ्यामुळे शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर जाण्याचा मार्गात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे पाणी शेतातच साचत आहे. तसेच शेतात राख साचल्याने शेतीची सुपीकता कमी होत असून शेतीच्या पिकांवर विपरीत परिणाम होऊन शेतजमीन नापिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी या गावातील शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता सदर राख वाहीणीची योग्य दुरुस्ती करून सुरु असलेली गळती कायमस्वरुपी थांबवावी अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांना केल्या आहे. तसेच शेतीतील पाणी वहन होण्याकरिता नालीचे बांधकाम करण्यात यावे, सदरहु गावातील रस्त्यावर नियमीत पाण्याचा छीडकाव करण्यात यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी आदीं सुचना या वेळी आमदार जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहे. या बैठकीला गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.