Home Breaking News Chandrapur @taluka news शिक्षकांच्या समस्यांची दखल घेऊन निर्णय प्रक्रीयेत सामील होणाऱ्या...

Chandrapur @taluka news शिक्षकांच्या समस्यांची दखल घेऊन निर्णय प्रक्रीयेत सामील होणाऱ्या व्यक्तिलाच विधान भवनात पाठवा- आ. कपिल पाटील यांचे आवाहन

120

Chandrapur @taluka news

■ शिक्षकांच्या समस्यांची दखल घेऊन निर्णय प्रक्रीयेत सामील होणाऱ्या व्यक्तिलाच विधान भवनात पाठवा- आ. कपिल पाटील यांचे आवाहन

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर- किरण घाटे-विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाच्या संमती शिवाय कोणतेही बिलाचे कायद्यात रूपांतर होत नाही. तेंव्हा शिक्षकांच्या समस्या पुढाकाराने सभागृहात मांडणारा अभ्यासु व्यक्तिच इथे गेला पाहिजे.व्यवस्थेशी तडजोड करून शिक्षकांच्या
अडी अडचणींकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती तुम्ही
सभागृहात पाठवणार आहात काय?असा घणाघाती सवाल करीत योग्य उमेदवारालाच या सभागृहात पाठवा असे आवाहन दि.४डिसेंबर २०२२ ला पार पडलेल्या एका भव्य शिक्षक मेळाव्यात आ. कपिल पाटील यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना केले आहे.

ते पुढे म्हणाले nep २०२२चे समर्थन आपण करणार आहात काय?ज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. २०पेक्षा कमी पटसंख्य असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ.देवतळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की शाळा कशी चालवावी हा मोठा यक्ष प्रश्न आज व्यवस्थापनासमोर उभा आहे. शाळेत शिकवायला शिक्षक नाहीत, नवे शिक्षक घ्यायला शासनाची परवानगी नाही.अशा परीस्थितीत शाळा चालवायच्या कशा तेच कळत नाही.तेंव्हा शिक्षक बंधुंनी आमदार निवडतांना अत्यंत काळजीपुर्वक व जबाबदारीने निवडावा असे त्यांनी या वेळी शिक्षकांना निक्षून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेडीकर यांनी केले तर संचालन डांगे यांनी केले.उपस्धितीतांचे आभार टोंगे यांनी मानले .

अधिवेशनाला शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.यावेळी अन्सारी यांना अल्पसंख्याक शिक्षक भारतीचे अध्यक्ष,पेटकर यांना जिल्हा संघटक, सुहास पडोळे यांना चंद्रपूर तालुका अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बावनकर, जिल्हाध्यक्ष, किशोर दहेकर, शहर अध्यक्ष, वासेकर अशोक तुमराम,जिल्हा संघटक, दिपक जवादे, खंडाळकर व सर्व चंद्रपूर जिल्हा शिक्षक भारतीच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले.
येत्या काळातील हे संभाव्य धोके लक्षात घेता त्यावर वैचारीक वादविवाद व भाष्य करणारी व्यक्तिच सभागृहात जायला पाहीजे.

म्हणुन आपण सर्व शिक्षक बांधव डॉ.राजेंद्र झाडे यांच्या सारख्या आक्रमक व अभ्यासु व्यक्तिला सभागृहात पाठवले पाहिजे.असेही आम. कपिल पाटील या मेळाव्यात बोलताना म्हणाले.
४ डिसेंबरला सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रपूरचे आम. किशोर जोरगेवार, शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेंद्र झाडे, खेडीकर प्रामुख्याने उपस्थित होते. अधिवक्ता वामनराव चटप( माजी आमदार) यांचे हस्ते सदरहु मेळाव्याचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलतांना अधिवक्ता चटप यांनी शासनाच्या दुटप्पी धोरणावर ताशेरेओढुन शिक्षकांनी याबाबत सजग राहुनआपला हक्काचा माणुस सभागृहात पाठवला पाहिजे असे मत व्यक्त केले.