Home Breaking News Chandrapur@ city news ओबीसी विद्यार्थी वसतीगृहामध्ये बिगर व्यावसायिक कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांचा...

Chandrapur@ city news ओबीसी विद्यार्थी वसतीगृहामध्ये बिगर व्यावसायिक कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांचा समावेश करा राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची मागणी

218

Chandrapur@ city news

■ ओबीसी विद्यार्थी वसतीगृहामध्ये बिगर व्यावसायिक कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांचा समावेश करा

■ राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची मागणी

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपूर:आज दिनांक २ डिसेंबर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रविंद टोंगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक प्रीती डुडलकर यांना निवेदन दिले. राज्य सरकारकडे ओबीसी विद्यार्थी वसतीगृहासाठी निधी नसल्याचे कारण समोर करीत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार आहे , तसेच या परिपत्रकात अन्य बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना वसतिगृहाची योजना लागू करण्या संदर्भातील कोणताही उल्लेख नाही.

सदर वसतीगृहे चालविण्यासाठी नव्याने मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा, १९५० व संस्था नोंदणी कायदा, १८६० अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था/ (N.G.O.) ना वसतीगृह चालविण्यासाठी तयार असल्यास अशा संस्थाना प्रत्येक जिल्ह्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १०० मुल व १०० मुली या मर्यादेत प्रति जिल्हा २०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यासाठी एकून ७२०० पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय पुरविण्यासाठी राज्य शासनाने मान्यता देण्याचे घोषित केले आहे.

शासकीय वसतीगृह निर्माण न करता इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्था/(N.G.O.) यांना वसतीगृह चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.

अशा एनजीओ कृत वसतीगृहांचा दर्जा काय असेल ? तसेच एससी, एसटी प्रवर्गाप्रमाणे स्वतंत्र वसतिगृहे का नाही? तसेच एससी, एसटी प्रवर्गाप्रमाणे स्वाधार योजना का लागू करण्यात आली नाही ? असे प्रश्न राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने उपस्थित केल आहेत.

या आदेशामुळे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होईल, हे परिपत्रक मागे घेवून राज्यातील प्रत्येक जिल्हात ओबीसी विद्यार्थांसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापित करा अन्यथा महाराष्ट्र राज्यभर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे ,प्रदीप वैरागडे, प्रकाश चालूरकर, अंजली कौरसे, स्नेहा घाटे, उमेश कौरसे,प्रशांत पिंपलशेंडे, नंदू ठावरी, प्रवीण राजूरकर, रोशन धुले विद्यार्थी निवेदन देते वेळी उपस्थित होते.