Home Breaking News ghugus city news ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार घुग्घुस शहर सेवा केंद्रात महामानवास...

ghugus city news ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार घुग्घुस शहर सेवा केंद्रात महामानवास अभिवादन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार: विवेक बोढे

112

ghugus city news

■ ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार घुग्घुस शहर सेवा केंद्रात महामानवास अभिवादन

■ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार: विवेक बोढे

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

घुग्घुस:घुग्घुस येथील ना. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार ६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित व माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तसेच भीमगीत गाण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार होते. संविधान आणि राष्ट्रनिर्माणा साठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय तत्वावर आधारित समाजरचना घडविण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस अहोरात्र मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मि विनम्र अभिवादन करतो.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नवबौध्द स्मारक तथा बहूउद्देशीय समिती घुग्घुसचे अध्यक्ष रामचंद्र चंदनखेडे, माजी सरपंच संतोष नुने, अमोल थेरे, विनोद चौधरी, साजन गोहने, बबलू सातपुते, शाम आगदारी, भारत साळवे, असगर खान, सुशील डांगे, शरद गेडाम, कुसुम सातपुते, अमीना बेगम, पूजा दुर्गम, कविता आमटे, नाजीमा कुरेशी, शारदा गोडसेलवार, सुनीता पाटील, कवन पडवेकर, शारदा झाडे, सुरेंद्र जोगी, दिलीप कांबळे, महेश लठ्ठा, गोविंद जांभुळकर, मल्लेश बल्ला, मूर्ती पेरपुल्ला, छाया पाटील, शारदा फुलझले, वैशाली भालशंकर, प्रकाश उईके, आर्यन मानकर, माया चटकी, श्रीकांत आगदारी, गजानन आमटे, महादेव दुर्गम, गजानन पाझारे, सुनंदा लिहीतकर, अजय लेंडे उपस्थित होते.