Jivti taluka@ news
■ गोदरू पाटील जुमनाके यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
जिवती :- तालुक्याचे निर्माते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. गोदरू पाटील जुमनाके यांचा द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
गोदरू पाटील जुमनाके यांचे विचार तळागाळात पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने कामाला लागावे, ते व्यक्ती म्हणून नाहीतर एक विचार म्हणून समोरच्या पिढीला आदर्श ठरेल त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांचे विचार पोहचले पाहिजे असे आव्हान यावेळी मान्यवरांनी केले.
या प्रसंगी स्व. गोदरू पाटील जुमनाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नगरसेविका सतलूबाई जुमनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकांबळे, नगरसेवक ममताजी जाधव, जमालुद्दीन शेख, क्रिष्णा सिडाम, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, माजी सभापती भीमराव मेश्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, खडकी रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच भारत कोटनाके, धोंडाअर्जुनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शमसूद्दीन शेख, येरमी येसापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच भीमराव मेश्राम, मूळनिवासी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, सल्लागार लिंगोराव सोयाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते नितीन बावणे, युवानेते विजय जुमनाके, मतीन शेख, अनिल आडे, सौ. शुभांगीताई जुमनाके, सौ. भाग्यश्रीताई मंगाम, सौ. शशिकलाताई वट्टी, सौ. सुनिताताई जुमनाके, कु. प्रियंका जुमनाके उपस्थित होते.