Home Breaking News Ballarpur city @ news उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर च्या विरोधात दप्तर...

Ballarpur city @ news उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर च्या विरोधात दप्तर दिरंगाई कायद्याचा वापर

148

Ballarpur city@ news

■ उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर च्या विरोधात दप्तर दिरंगाई कायद्याचा वापर

सुवर्ण भारत:ताहीर शेख
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर: राजू किसनराव वानखेडे राहणार श्रीराम वार्ड बल्लारपूर तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांना आर. एन. आय. नवी दिल्ली तर्फे साप्ताहिक “बल्लारपूर मंथन” या मथळयाखाली साप्ताहिक न्यूज पेपर प्रकाशित करण्यासाठी टायटल व्हेरिफाइड दिनांक: 10/11/ 2022 ला झाले होते.
त्या अनुषंगाने त्यांनी सर्व कागदपत्रे जमा करून दिनांक: 29/11/2022 ला उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे दाखल केले होते.

तसेच दिनांक: 01/12/2022, दिनांक: 06/12/2022, दिनांक: 07/12 /2022, दिनांक:08/ 12/ 2022 आणि दिनांक: 12/12/2022 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात भेट देऊन पुन्हा मागितलेल्या कागदा पत्राची पूर्तता केली. याची सर्व नोंद त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आहे. परंतु काम न झाल्याने शेवटी त्रासून जाऊन दप्तर दिरंगाई कायदा 2006 चा वापर करण्यात आला.
यात दिनांक: 19/12/2022 उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय बल्लारपूर यांच्या बाबत माननीय जिल्हा अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना तसेच कनिष्ठ लिपिक, उपविभागीय कार्यालय बल्लारपूर यांच्या बाबत उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांना दप्तर दिरंगाई चा कायदा 2006 पंजीबद्द डाकेने देण्यात आला.

यात दप्तर दिरंगाई बाबत शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची मागणी राजू वानखेडे यांनी केलेली आहे.

राजू किसनराव वानखेडे यांनी सांगितले आहे की, ते पेपराचे मालक असून त्यांचा पेपर निघो नाहीतर नको निघो परंतु अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे.