Home Breaking News Chandrapur city@ news समता युवक संघ बाबुपेठ वार्ड चंद्रपूरच्या वतीने अशोक...

Chandrapur city@ news समता युवक संघ बाबुपेठ वार्ड चंद्रपूरच्या वतीने अशोक स्तंभाचे लोकार्पण गोल्ड मेडल विजेता कु. करिश्मा कुरेशी यांना माजी.नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले

717

Chandrapur city@ news

■ समता युवक संघ बाबुपेठ वार्ड चंद्रपूरच्या वतीने अशोक स्तंभाचे लोकार्पण

■ गोल्ड मेडल विजेता कु. करिश्मा कुरेशी यांना माजी.नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपुर:समता चौक, बापेठ वार्ड चंद्रपूर येथे समता युवक संघाच्या वतीने दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ ला माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांच्या सामूहिक जयंतीनिमित्य कार्यक्रमाचे उद्घाटक काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले.

सर्वप्रथम बेरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह येथील भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला नरेशबाबू पुगलिया व राजु कक्कड यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर समता युवक संघ, बाबुपेठ वार्ड चंद्रपूरच्या वतीने कार्यक्रमाचे उद्घाटक नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मदना धम्मोपोष मेता ( महाथेरो ) कार्यक्रमाचे आयोजक तथा अध्यक्ष समता युवक संघ, विनोद लभाने, स्वागोत्सुक सौ. प्रितीताई वि. लगाने व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नरेशबाबू पुगलिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भदन्त धम्मोपोष मेता व प्रमुख पाहुणे राजीव कक्कड, एन.डी. पिंपळे, माजी नगरसेवक स्नेहल रामटेके, हनुमान चौखे, राजेश उके, प्रदिप किरने, माजी नगरसेविका पुष्पाताई मुन, लताताई साव, महानंदाताई वाळके, माजी नगरसेवक देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, सामाजिक कार्यकर्ता चंदाताई वैरागडे, चारुशीला बारसागडे, वर्षा घडसे, नितीन जामूळे, संजय कासवटे, राजू रामटेके, राजवीर यादव अवतारसिंग गोत्रा, महेश मॅकलवार, उमंग हिवरे, संजय मेश्राम, महेश वासलवार, जयदिप गोत्रा यांचे आयोजक समिती कडून स्वागत करण्यात आले.

या अनावरण सोहळा प्रसंगी नरेशबाबू म्हणाले कि, भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक स्तंभाची निवड ही भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांच्या दुरदर्शी विचार सरणीचे प्रतिबिंब आहे. अशोक चक्राला कर्तव्याचे चाक देखील म्हटले जाते. हे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोक चक्रामध्ये अश्या सर्व गुणांच्या उल्लेख केलेला आहे. तसेच चंद्रपूर येथे अशोक स्तंभाची स्थापना केल्या बद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. व या कार्यक्रमाप्रसंगी बाबूपेठ वार्ड येथे अशोक स्तंभाची निर्मिती केलेले शिल्पकार अरविंद वाघधरे तसेच इंडियन पॉवरलिफ्ट ( विशाखापट्टम) येथे गोल्ड मेडल विजेता कु.करिश्मा कुरेशी यांचे आयोजकांच्या वतीने शाल, मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आता या दोघांना नरेशबाबू पुगलिया यांच्या वतीने प्रत्येकी 5000/- ( पाच हजार रुपये ) प्रोत्साहनपर बक्षीष देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भदन्त धम्मोपोष मेता यांनी म्हटले कि भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक स्तंभाचे महत्व आहे. तसेच अशोक स्तंभाची व अशोक चक्राची माहिती दिली.

याकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद लभाणे, सुत्रसंचालन सौ. नम्रता धम्मदिप रायपुरे आभार सौ. आम्रपाली दिनेश मेश्राम यांनी केले. तसेच अनावरण व स्वागत सोहळा नंतर सांस्कृतिक कार्यक्रम समता म्युझीकल गृप सादरकर्त उपेंद्र बनकर व संघ यांनी सादर केले.

यासर्व कार्यक्रमामध्ये अथक परिश्रम घेणारे श्री कमलेश चव्हाण, दिनेश मेश्राम, धिरज बागसरे आदेश बंजारी, प्रकाशजी बोरकर,