Home Breaking News नागपूर विभागीय क्रिकेट सामने -गडचिरोली जिल्हा संघ विजेता तर चंद्रपूर जिल्हा महसूल...

नागपूर विभागीय क्रिकेट सामने -गडचिरोली जिल्हा संघ विजेता तर चंद्रपूर जिल्हा महसूल संघ ठरला उपविजेता !

97

■ नागपूर विभागीय क्रिकेट सामने -गडचिरोली जिल्हा संघ विजेता तर चंद्रपूर जिल्हा महसूल संघ ठरला उपविजेता !

सुवर्ण भारत : किरण घाटे (सहसंपादक)

चंद्रपुर:दोन वर्ष कोरोनाचा कालावधी असल्यामुळे विभागीय स्तरावर कुठल्याही क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा झाल्या नाहीत.या वर्षि दि.२५फेब्रुवारी ते २७फेब्रुवारी पर्यंत नागपूर मुक्कामी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .याच अनुषंगाने उपराजधानीत काही क्रिकेटचे अटीतटीचे व रंगतदार सामने पार पडले.

दरम्यान चंद्रपूर जिल्हा महसूल संघाने काल रविवारी बलाढ्य नागपूर जिल्हा संघाला व वर्धा जिल्हा क्रिकेट संघाला पराभूत करुन अंतिम फेरी गाठली.आज नागपूरच्या मैदानावर सकाळी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा महसूल संघात क्रिकेटचा सकाळी एक सामना पार पडला .सदरहु सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गडचिरोली संघाने १५षटकात मोठ्या धावांचा डोंगर उभा केला.त्यांनी तडाखेबाज ११५धावा फलकावर जोडल्या.

या धावांचा पाठलाग करताना चंद्रपूर जिल्हा संघाची बरीच दमछाक झाली.धाव संख्या वाढविण्याचा चंद्रपूर संघा कडून आटोकाट प्रयत्न केला गेला पण चंद्रपूर जिल्हा संघाचे गडी एकामागोमाग बाद होत गेले . शेवटचा गडी बाद झाला तेव्हा चंद्रपूर जिल्हा महसूल संघाची धावसंख्या १०५ होती.चंद्रपूर जिल्हा संघाला हे आव्हान पेलले नाही.त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.आयोजित या सामन्यात नागपूर, भंडारा, गोंदिया गडचिरोली, वर्धा, व चंद्रपूर जिल्हा संघाने भाग घेतला होता.

दरम्यान उपरोक्त क्रिकेट सामन्यात गडचिरोली जिल्हा संघ विजेता तर चंद्रपूर जिल्हा महसूल क्रिकेट संघ उपविजेता ठरला आहे.यंदाच्या विविध स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय व नेत्रदीपक अशीच राहिली आहे. चंद्रपूर जिल्हा महसूल संघातील उत्कृष्ट कामगिरी करुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे व स्पर्धंकांचे नायब तहसीलदार डॉ.कांचन जगताप ,सावलीचे तहसीलदार परिक्षीत पाटील, चंद्रपूर जिल्हा कार्यालयातील अधिक्षक प्रिती डुडुलकर, भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे,मूलचे तहसीलदार रविंद्र होळी ,सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे, ब्रम्हपूरीच्या तहसीलदार उषा चौधरी, चंद्रपूरचे नायब तहसीलदार राजू धांडे ,जिवतीचे प्रभारी तहसीलदार प्रविण चिडे, चिमूरचे नायब तहसीलदार तुळशीराम कोवे,मूलचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार, कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे ,चंद्रपूरचे सेवानिवृत्त खनिकर्म निरीक्षक बंडू वरखेडे, व राजूरा उपविभागाचे पटवारी सुनिल रामटेके यांनी अभिनंदन केले आहे.