Home Breaking News Sirocha @taluka news •समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित व्हा:माजी जि प अध्यक्ष...

Sirocha @taluka news •समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित व्हा:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम…! • सिरोंचा येथे वार्षिक सांस्कृतिक संमेलन व कोयापूनेम पंडुम..!

274

Sirocha @taluka news

•समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित व्हा:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम…!

• सिरोंचा येथे वार्षिक सांस्कृतिक संमेलन व कोयापूनेम पंडुम..!

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(मुख्य संपादक)

सिरोंचा: गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे.मात्र तो विखुरला आहे.त्यामुळे समाजाकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे समाजाची उपेक्षा कायम आहे. हक्क, कर्तव्य समजावून सांगत त्यांची जनजागृती करणे गरजेचे आहे. एकट्याने लढून मिळणार नाही. त्यासाठी एकत्रित ताकद निर्माण करणे गरजेचे आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज एक संघ राहिला तर आपले प्रश्न सुटतील, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी समाजाने मतभेद बाजूला ठेवून संघटित झाले पाहिजे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.

ते सिरोंचा तालुका मुख्यालयातील गोंडवाना गोटूल भूमी येथे आयोजित वार्षिक सांस्कृतिक संमेलन तथा कोया पूनेम पंडुम कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे,गटविकास अधिकारी विकास घोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली,सिरोंचा माजी प स सदस्य समय्या कुळमेथे,कमलापूर चे माजी उपसरपंच शंकर आत्राम,अहेरी चे माजी प स सदस्य मांतय्या आत्राम,येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे,बाबुराव तोरेम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृतीचे चिकित्सक दृष्टिकोन तपासणी करून आपल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे. त्यातूनच येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आपल्याला देता येईल असे प्रतिपादन केले.

वार्षिक सांस्कृतिक संमेलन तथा कोया पूनेम पंडुम मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
समाजात असलेल्या रुढी परंपरा व कला गुणांना वाव देण्यासाठी रेलानृत्य स्पर्धा घेण्यात आले. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम,द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिक देण्यात आले.

वार्षिक सांस्कृतिक संमेलन तथा कोयापुनेम पंडुम कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी गोंडवाना गोटूल समितीचे अध्यक्ष मधुकर मडावी, सचिव शंकर चिंतुरी,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सिरोंचा चे अध्यक्ष एन आर मरसकोल्हे,सचिव जयभगवान मडावी तसेच आदी समाजातील बांधवांनी सहकार्य केले.