Home Breaking News Chandrapur @dist news • मारडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध !. ...

Chandrapur @dist news • मारडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध !. •वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही.

287

Chandrapur @ dist news

• मारडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध !.

•वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर

मारडा : मारडा गावाच्या लोकांनी आपल्यावर नेहमीच प्रेम केले आहे. लोकांच्या सदिच्छेमुळे आपल्याला आयुष्यात मागे वळुन बघण्याचे काम पडले नाही. मारडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहो,लवकरच गावातील पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मारडा ग्राम पंचायतीच्या ग्राम पंचायत भवन, पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण व नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ग महामंत्री नामदेव डाहुले, जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सभापती ब्रीजभूषण पाझारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, सरपंच गणपत चौधरी, उपसरपंच बाळुभाऊ काळे, सुभाष पिंपळशेंडे, वंदना पिंपळशेंडे, आरवटच्या सरपंच सुलभा भोंगळे, संजय माकोडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की मारडा या गावाशी आपले जुने नाते आहे. गावातील लोकांनीही जातीपातीच्या राजकारणापासून सावध राहावे. राज्य सरकार गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचावा म्हणून प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ६ हजार रुपये टाकत होती. आता राज्य सरकारही त्यात आपला ६ हजाराचे योगदान देणार आहे. परिणामी आता शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये टाकण्याचा निर्णय झालाय. ग्रामपंचायतीने अशा योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.

राज्याचे अर्थमंत्री असताना आपण निराधारांना मिळणारे अर्थसहाय्य ६०० रुपयांवरून १ हजार रुपये केली. दोन अपत्य असणाऱ्यांना १ हजार २०० रुपये मदत देण्याचा निर्णय केला. आता शासनाने त्यातही वाढ केली आहे. निराधारांची मदत १ हजार ५०० रुपये झाली आहे. गावातील निराधारांनी या योजनेला फायदा घ्यावा. ग्रामपंचायतीनेही अशा निराधारांची काळजी घ्यावी, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

“राष्ट्रसंतांच्या विचारांची आवश्यकता”

ग्राम विकास साधायचा असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची आजच्या युगात आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राष्ट्रसंतांच्या विचाराशिवाय कोणतेही गाव आदर्श होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.