Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर तथागत बुद्ध विहार द्वारा आयोजित उन्हाळी...

Ballarpur city@ news • बल्लारपुर तथागत बुद्ध विहार द्वारा आयोजित उन्हाळी शिबिर संपन्न.

186

Ballarpur city@ news

• बल्लारपुर तथागत बुद्ध विहार द्वारा आयोजित उन्हाळी शिबिर संपन्न.

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपुर:विद्यानगर वार्ड बल्लारपुर तथागत बुद्ध विहार भव्य पटांगणात विद्यार्थी साठी उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात मोबाईल व इलेक्ट्रॉनिक गॅजेट मुळे मुले मैदानी व बौद्धिक खेळापासून दूर होत चालले आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, धार्मिक, वैचारिक तथा सर्वांगीक विकास होण्याचा उद्देशाने उन्हाळी शिबिर चे आयोजन ५में २०२३ बुद्ध जयंती निमित्त उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

१६५ विद्यार्थिनी या शिबिरात सहभाग घेतला, ५ ते १३ वर्षा पर्यंत विद्यार्थी होते. धम्मज्ञान भाषण कला निबंध पत्र लेखन व्याकरण नित्य संगीत चित्रकला कथा बुद्धिबळ रायफल शूटिंग हॉकी बेसिक आर्चरी बेसिक इत्यादी यासोबतच पारंपारिक खेळ मामाच्या पत्र हरवलं पिंकी पिंकी वाट कलर चार कोणते लंगडी नदी का पहाड रस्सी खेच संगीत खुर्ची चाय की पत्ती मोसंबी नाव गाव वस्तू प्राणी भावनिशीपटणी आणि इत्यादी खेळ खेळण्यात आली
या शिबिराला मार्गदर्शक म्हणून उमेश पाटील पोलीस निरीक्षक, अनिल वागदरकर मुख्याध्यापक थापर हायस्कूल, भास्कर भगत धम्म प्रचारक, उषाताई पानबुडे परिचारिका व सामाजिक कार्यकर्ता, किशोर मोहरुले क्रीडा शिक्षक मोठफोर्ट स्कूल बामणी व तालुका क्रिडा संयोजक बल्लारपूर,राजेश केतवार नित्यशिक्षक मों.फोर्ट बामणी, सुनील कांबळे क्रीडा शिक्षक, दीपक वाळके हॉकी प्रशिक्षक,शुभांगी देशपाल शिक्षिका, श्रीमती वर्षाताई भागवत शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ता पारूताई भरणे शिक्षिका व सामाजिक कार्यकर्ता, आणि मून डेकोरेशन आई एक्वा कूल वॉटर यांची सहकारी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बेताल सचिव अँड. पवन मेश्राम,उपाध्यक्ष सुनील कांबळे,कोषाध्यक्ष आशिष अलोने, वैशाली भसारकर, सुलक्षणा आलोने,भाग्यलक्ष्मी वाघमारे, अर्चना वानखेडे, भावना वाळके, शालू चांदेकर, सुकेशनी मेश्राम, जयश्री बेताल, पारुल भरणे, व समस्त रमाई महिला मंडळ बल्लारपूर तथागत बुद्ध विहार व रमाई महिला मंडळ बल्लारपूर सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.