chandrapur dist@news
⭕ प्रफुल बनकर नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पाचवा क्रमांक
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर :- आंतरराष्ट्रीय पातळीवर हिमालया स्टलियन स्पोर्ट्स फेस्टिवल चे दिल्ली मधील प्रगती मैदानात जित सलाल यांच्या मार्गदर्शनात नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन 10 जून ते 11 जून 2023 या दोन दिवसात करण्यात आले होते.
यामधे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील नॅचरल बॉडी बिल्डरस चा सहभाग होता. यामधे प्रफुल बनकर वय 35 वर्ष याने चंद्रपूर जिल्ह्यातून सहभाग नोंदविण्याचा मान मिळवला असून 65 किलो वजनी गटात खेळून आंतर राष्ट्रीय पातळीवर 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे प्रफुल चे वजन गट हे 53 किलो असून ही त्याला 55 किलो वजन गट स्पर्धा नसल्यामुळे 65 किलो वजन गटात खेळावे लागले आहे. या गटात अनेक स्पर्धक असूनही वजनाचं भान न ठेवता त्याने ही बॉडी बिल्डींग स्पर्धा खेळून उत्कृष्ट कामगिरी दाखविली आहे.
पहिल्या सत्रात टॉप 10 मध्ये देखील प्रफुल ने उत्तम प्रदर्शन दाखवून आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 65 किलो वजन गटात त्याने पाचवा क्रमांक पटकविला आहे. या स्पर्धेमध्ये देशातील 850 स्पर्धकांनी सहभाग नोंदविले होते. यामध्ये वेगवेगळ्या वजन गटातील स्पर्धकांचा ही सहभाग होता. स्पर्धेच्या सुरवातीला डोपिंग टेस्ट आणि युरीन टेस्ट केल्या गेली ज्यामध्ये स्टरोईड मिळाले नाही आणि नंतरच स्पर्धकांना या स्पर्धेत नाव नोंदवता आले आहे.
चंद्रपूर मध्ये नॅचरल बॉडी बिल्डिंग ची सुरवात करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे प्रफुल ने सांगितले. सध्या फिटनेस आणि बॉडी बनविणे हे आजच्या तरुणाची आवड बनली आहे. आणि यासाठी हा तरुण वर्ग चुकीचा मार्ग अवलंबताना दिसत आहे. यासाठी कधी डोपिंग, पावडर, इंजेक्ट करून शरीराला नको अश्या गोष्टीचा वापर करून शरीरयष्टी म्हणजेच बॉडी बनवतात. मेहेनत न करता, योग्य आहार न घेता चुकीच्या मार्गाने बॉडी बनविणाऱ्या या तरुण वर्गाला वेगवेगळ्या त्रासाला समोर जावं लागते. कधी श्वसनाचे आजार , त्वचा रोग आणि बरेचसे मोठे आजारांना समोर जावं लागते आहे. परंतु प्रफुल हा नॅचरल बॉडी बनविण्यासाठी प्रोत्साहित करतो आहे.
सकस आहार आणि योग्य व्यायाम करून त्याने नॅचरल बॉडी बनवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2022 मध्ये अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये प्रफुल बनकर ने नेहमीच पहिला ,दुसरा क्रमांक पटकविला आहे. याबद्दल सर्व स्तरावरून त्याचे कौतुक होत आहे. यासाठी ॲसुर जिमचे संचालक अनुज सोनी, विजय बनकर,अमर बनकर यांनी प्रोत्साहित केले असून राहुल बनकर, वैष्णवी कथलकर , निखिल नन्हेत, रितेश गोटे, रोहित जवादे, समर्थ दूधलकर , सतीश खडके, गंगा देशियावाले, प्रसाद पट्टेवाले आणि घरच्यांचे ही सहकार्य लाभले असून अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.