Home Breaking News Ballarpur city@ news • विसापुर घरकुल आवास योजने मध्ये समाविष्ट नावे पंचायत...

Ballarpur city@ news • विसापुर घरकुल आवास योजने मध्ये समाविष्ट नावे पंचायत समिती बल्लारपुर स्तरावरून गायब.

170

Ballarpur city@ news
• विसापुर घरकुल आवास योजने मध्ये समाविष्ट नावे पंचायत समिती बल्लारपुर स्तरावरून गायब.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- विसापूर ग्राम पंचायत हद्दी मधील यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजना अंतर्गत ग्राम पंचायत विसापूर यांचे कडून (व्ही.जे,एन टी) प्रवर्गातील ५० कुटुंबाची नावे पंचायत समिती, बल्लारपुर कडे पाठविण्यात आली. सदर ५० लाभार्थी पैकी ४० लाभार्थी पात्र करण्यात आले.परंतु या यादी मध्ये प्रभाग क्रमांक ०५ येथील नत्थू महादेव चौधरी व उत्तम सोनटक्के यांची नावे अनुक्रमे ३२ व ३६ क्रमांका वर नमूद होती.
पंचायत समिती, बल्लारपुर यांचे कडून प्राप्त पात्र लाभार्थी यादी मधुन नामे नत्थू महादेव चौधरी व उत्तम सोनटक्के यांचे नाव वगळण्यात आले होते. याची माहिती बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चे सचिव प्रितम पाटणकर यांना मिळताच त्यांनी लगेच विसापूर येथील सरपंच सौ. वर्षाताई कुळमेथे यांचा सोबत चर्चा करून झालेली चूक लक्षात आणून दिली.या वेळेस सरपंच सौ.वर्षाताई कुळमेथे यांनी सकारात्मक चर्चा करून या विषया बद्दल सवर्ग विकास अधिकारी यांचेशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले.

या प्रसंगी प्रीतम पाटणकर यांनी सांगितल्या प्रमाणे विसापूर गावातील दोन गरीब आवश्यक कुटुंबावर अन्याय झाल्यास युवक काँग्रेस कमिटी विसापूर कदापी खपवून घेणार नाही असे ठणकाऊन सांगितले व तात्काळ कुणाच्या चुकीमुळे नाव वगळण्यात आले माहिती करून या घरकुल लभार्ती पासून वंचित असलेले नथू महादेव चौधरी व उत्तम सोनटक्के या दोन गरीब कुटुंबांना त्यांचं हक्काचे घरकुल देण्यात यावी असे सरपंच व ग्राम विकास अधिकारी विसापूर यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.