Home Breaking News Chandrapur city@ news • गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत द्या • ठगी...

Chandrapur city@ news • गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत द्या • ठगी पीडित जमाकर्ता परिवार संघटनेची मागणी

122

Chandrapur city@ news
• गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत द्या

• ठगी पीडित जमाकर्ता परिवार संघटनेची मागणी

चंद्रपूर : मैत्रेय, समृद्ध जीवन मल्टीस्टेटसारख्या शेकडो गुंतवणूक कंपन्यांनी देशभरात शाखा उघडून दामदुप्पटीच्या नावाखाली कोट्यवधी नागरिकांची फसवणूक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या लाखांच्या घरात असून, राज्यसरकारच्या एमपीडीए किंवा केंद्र सरकारच्या फसवणूक पीडित नागरिकांना रक्कम परत मिळवून देण्याची हमी देणाऱ्या बड्स -२०१९ या कायद्याची कठोर अमलबजावणी करून गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी ठगी पीडित जमाकर्त परिवार संघटनेने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मागील काही वर्षांत देशात गुंतवणुकीतून दामदुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अनेक संस्थांना ऊत आला होता. विशेष म्हणजे या संस्था विविध आस्थापनांच्या नावाखाली नोंदणीकृत होत्या. दहा ते बारावर्ष व्यवहार सुरू असल्याने अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. त्यामुळे अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली. विशेषता महिला, लहानमोठे व्यावसायिक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या रकमा यात गुंतविल्या आहे. पंरतु, रक्कम परत न देताच या कंपन्यांनी कार्यालयांना कुलूप ठोकून पोबारा केला आहे. यातील बहुतांश कंपन्यांविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही संचालकांना अटक करण्यात आली असून, ते तुरुंगात आहेत. मात्र, गुंतवूणकदारांची रक्कम अद्याप परत मिळलेली नाही. त्यामुळे रक्कम परत मिळेल की नाही या संभ्रमात ग्राहक आहेत.

गुंतवूणकदारांना रक्कम परत मिळवून देण्याची हमी देणारा बड्स ॲक्ट केंद्रसरकारने मंजूर केला असून, या कायद्याची कठोर अमलबजावणी करून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन, संंबंधितांचे बँक खाते गोठवून रक्कम गुंतवणूकदांराच्या बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. गुंतवूणदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ठगी पीडित जमाकर्ता परिवार ही देशव्यापी संघटना स्थापना करण्यात आली असून, रक्कम परत मिळवून देण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारण्यात आल्याची माहिती यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पत्रकार परिषदेला संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वर्षा लाटे, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मीना मत्ते, सचिव नंदा पंदिलवार, वीणा पुंडकर, प्रवीण बावणे, माधुरी निखाडे आदी उपस्थित होते.