Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

Ballarpur city@ news • बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

60

Ballarpur city@ news
• बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज बल्लारपूर मधील सर्व शासकीय कार्यालयांनी एकत्रित येत स्केटिंग ग्राउंड, डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर येथे सकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत योग साधना कार्यक्रम पार पाडला.
सदर शासकीय कार्यक्रमात बल्लारपूरचे तहसीलदार श्रीमती कांचन जगताप, नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, पोलिस निरीक्षक उमेश पाटील आदि प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. चंदनसिंह चंदेल, माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमात नगरपरिषदचे उपमुख्याधिकारी जयवंत काटकर, शिक्षण विभाग लिपिक रीना बोहोथ, शहर समन्वयक मंगेश सोनटक्के, प्रभारी अग्निशमन अधिकारी शब्बीर अली यांच्यासहीत इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे या शासकीय कार्यक्रमात सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बल्लारपूर मधील जनता योग साधनेबाबत जागरूक असल्याची प्रचिती करून दिली.