Ghugus city @news
• नवनिर्मित विहार बांधकामास गावंडे परिवारांनी दिले पाच हजार दान
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
घुग्घुस:घुग्घुस येथील दि.२१ जून २०२३ बुधवार रोज ला स्मृतीशेष संजय वाल्मीक गावंडे यांच्या तिसरा दिवस मोठ्या प्रमाणात न करता थोडक्यात करून त्यांचे मोठे बंधू कीर्तीकुमार वाल्मीक गावंडे यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसच्या वतीने सुरु असलेल्या नवनिर्माण विहार बांधकामास पाच हजार दान दिले.
किर्तीकुमार वाल्मीक गावंडे यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी आखलेली संकल्पना की आपण वाढदिवस, तिसरा दिवस, लग्नाचा वाढदिवस, व अनेक लहान मोठे कार्यक्रम करुन आपण खुप मोठ्या प्रमाणात व्यर्थ पैसा खर्च करतो आणी त्यामधून साध्य काहीच होत नाही.
म्हणून आपण हा पैसा खर्च नकरता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैसांचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल.
यावेळी बांधकाम विहार कोषाध्यक्ष हेमंत पाझारे, कार्याध्यक्ष चन्द्रगुप्त घागरगुंडे ,महासचिव रमाबाई सातार्डे, महिला उपाध्यक्ष मायाताई सांड्रावार्, कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे ,किर्तीकुमार गावंडे त्यांची आई व पत्नी समाज बांधव उपस्थित होते.